मुंबईत 19 ते 21, 24 ऑक्टोबर या कालावधीत मद्यविक्रीस बंदी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, October 6, 2019

मुंबईत 19 ते 21, 24 ऑक्टोबर या कालावधीत मद्यविक्रीस बंदी


मुंबई - विधानसभा सार्वत्रिक निवडणुका खुल्या, मुक्त, निःपक्षपातीपणे निर्भीय वातावरणात पार पाडण्यासाठी 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून ते दि. 21 ऑक्टोबर पर्यंत पुर्ण दिवस या कालावधीत तसेच मतमोजणी दिवशी 24 ऑक्टोबर रोजी मद्य विक्रीवर प्रतिबंध ठेवणे तसेच मद्य विक्रीच्या सर्व अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जोंधळे यांनी दिली आहेत.

शासन अधिसूचना, गृह विभाग क्र. बीपीए-2014/1259/1/ इएक्ससी-3 दि. 12 जुलै 1919 अन्वये सुधारित केलेल्या महाराष्ट्र देशी दारू नियमावली 1937 च्या नियम क्रमांक 26(1) सी (1) (2), महाराष्ट्र मद्य (रोखीने खरेदी विक्रीच्या नोंदवह्या इत्यादी) नियमावली 1969 च्या नियम 9 (2) सी (1) (2) तसेच महाराष्ट्र ताडी (अनुज्ञप्त्या देणे) आणि (ताडी छेदणे) नियमावली 1968 च्या नियम 5 () (1) (2) तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) मधील तरतूदी नुसार अनुक्रमे एफएल-1, एफएल-2, एफएल-3, एफएल/बीआर-2, सीएल-2, सीएल-3, ताडी इत्यादी संबंधित सर्व अनुज्ञप्त्या निवडणुकीच्या कालावधीत बंद ठेवण्याचे लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 135सी अन्वये तरतूद करण्यात आली आहे.

त्यानुसार मुंबई शहर जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 ची मतदान प्रक्रिया मतमोजणी संबंधी जिल्ह्यात शांतता सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तसेच निवडणूक सुरळीतुपणे खुल्या वातावरणात पार पाडण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देश उपरोक्त देशी विदेशी इतर नियमावलीतील तरतुदीनुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मुंबई जिल्ह्यातील सर्व संबंधित मद्य विक्रीच्या, ताडीच्या इतर संबंधित अबकारी अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री जोंधळे यांनी दिले आहेत. संबंधित अनुज्ञप्तीधारक या आदेशाचे उल्लंघन करून मद्याची विक्री करीत असल्याचे आढळल्यास, ते धारण करीत असलेली अनुज्ञप्ती कायम स्वरूपी रद्द करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे.