आता या वेळेत राणादा येणार प्रेक्षकांच्या भेटीला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, October 6, 2019

आता या वेळेत राणादा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

https://ift.tt/2ASfYF7
मुंबईः झी मराठीवरील '' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा होती. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. आणि पाठक बाई आता वेगळ्या वेळेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रांगडा 'राणादा' आणि लाघवी पाठक बाई तर जणू प्रत्येकाच्या कुटुंबाचा भागच बनले आहेत. त्यामुळं मालिका संपणार हे समजताच अनेकांचा हिरमोड झाला. मात्र, 'तुझ्यात जीव रंगला' बंद असून फक्त प्रसारित होण्याची वेळ बदलली आहे. झी मराठीनं शेअर केलेल्या एका व्हिडिओत 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेची वेळ ७.३० नसून संध्याकाळी ६.३० वाजता करण्यात आली आहे. तसंच होम मिनिस्टर कार्यक्रमाची वेळ देखील बदलण्यात आली आहे. आता प्रेक्षकांचे लाडके भाऊजी संध्याकाळी सहा वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेच्या जागी आता '' ही मालिका प्रदर्शित होणार आहे. नुकताच झी मराठीवर या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. गावाकडून परदेशात नोकरीनिमित्त गेलेला मुलगा पुन्हा घरी येतो. कुटुंबातील प्रत्येकाला त्यांच्या आवडीची भेटवस्तू आणतो आणि शेवटी स्वत:सोबत घेऊन आलेल्या परदेशी मुलीची घरात एन्ट्री होते. या मुलीला पाहून सगळे कुटुंबीयदेखील थक्क होतात. प्रोमो संपल्यावर ही मालिका येत्या २१ ऑक्टोबर २०१९ पासून रात्री ७.३० वाजता झी मराठीवर प्रक्षेपित होणार असल्याचे सांगितले जाते. 'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका अल्पावधीतच छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ठरली. राणादा आणि पाठक बाई यांची आगळी-वेगळी लव्हस्टोरी सगळ्यांनाच आवडली. २०१६मध्ये सुरू झालेली ही मालिका अजूनही टीआरपीच्या शर्यतीत टिकून आहे. राणादा आणि पाठक बाई यांच्याबरोबरच वहिनीसाहेब, छोट लाडू, सन्नी दा, चंदा यांच्या भूमिकेलाही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. मालिकेत सध्या सर्व गावात आणि घरात वहिनीसाहेबांचीच सत्ता आहे, असं दाखवण्यात आलं आहे. राणा दा पाठक बाईंच्या मदतीनं नंदिता वहिनींची सत्ता मोडून काढण्याच्या प्रयत्नात आहेत. राणादा आणि अंजली बाईना त्यांच्या या प्रयत्नात यश मिळणार का? नंदिता वहिनी सुधारणार का? या सगळ्यांची उत्तरे येत्या काही दिवसांतच मिळणार आहेत.