'अॅपल' मुळे गे झालो; कंपनीवर ठोकला दावा! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, October 4, 2019

'अॅपल' मुळे गे झालो; कंपनीवर ठोकला दावा!

https://ift.tt/2IkSfBC
मॉस्को: रशियाच्या एका तरुणाने आघाडीची टेक कंपनी अॅपलला कोर्टात खेचलं आहे. या तरुणाचा दावा आहे की कंपनीच्या एका अॅपमुळे तो झाला. तो म्हणतो की आयफोनच्या एका अॅपने त्याला बदलवलं, ज्यामुळे त्याचा आत्मविशास ढासळला. मॉस्कोच्या एका न्यायालयात या युवकाने याचिका दाखल केली आहे. त्याने त्याला या प्रकरणी २२,८०० डॉलर्सच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. त्याचा दावा आहे की यंदाच्या वर्षी उन्हाळ्यात बिटकॉइन साठी एक ऑर्डर दिली होती, पण अॅपलच्या अॅपने त्याला 'गेकॉइन' ची डिलीव्हरी केली. युवकाचे वकील सपिहाट गु्स्नोएव्हाने सांगितलं की हे प्रकरण गंभीर आहे, कारण त्याचा अशील 'भयभीत आणि पीडित' आहे. युवकाला मिळालेल्या गेकॉइन क्रिप्टोकरन्सीवर एक ओळ लिहिली होती, ज्यामुळे या युवकांच संपूर्ण आयुष्य बदललं. त्याने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की या गेकॉइनवर एक सूचना लिहिली होती - ट्राय करण्याआधी जज करू नका. तो म्हणतो, 'ते वाचल्यानंतर मी विचार केला की कोणाला ट्राय केल्याशिवाय मी त्याबद्दलचं मत कसं बनवू शकतो? मग मी संबंध ठेवून पाहिले.' पीडित युवकाने लिहिलंय की आता माझ्याकडे एक बॉयफ्रेंड आहे, पण मला हे कळत नाही की मी माझ्या पालकांना हे कसं सांगू. माझं जीवन खूप वाईट पद्धतीने बदललं आहे आणि कदाचित मी कधीही सामान्य पुरुषाप्रमाणे आयुष्य जगू शकत नाही. अॅपलचे सीईओ अभिमानाने सांगतात 'मी गे आहे' दरम्यान, अॅपलचे सीईओ स्वत: आहेत. 'मी गे आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. देवानं मला दिलेली ही सगळ्यात मोठी भेट आहे असं मला वाटतं, असं अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांनी म्हटलंय.