तुम्हाला राज्य चालवायचं आहे, स्वयंपाक करायचा नाही: पवार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, October 12, 2019

तुम्हाला राज्य चालवायचं आहे, स्वयंपाक करायचा नाही: पवार

https://ift.tt/33jvK8i
बार्शी (सोलापूर): पुन्हा सरकार आल्यानंतर १० रुपयांत जेवण देण्याच्या शिवसेनेच्या घोषणेची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी जोरदार खिल्ली उडवली आहे. 'शिवसेनेची झुणका-भाकर योजना कधी बंद झाली ते कळलंही नाही आणि आता ते थाळी देणार आहेत. तुम्हाला राज्य चालवायचं आहे, स्वयंपाक करायचा नाही,' असा सणसणीत टोला पवार यांनी शिवसेनेला हाणला आहे. वाचा: सोलापुरातील बार्शी इथं झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत शरद पवार बोलत होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आज आपला वचननामा जाहीर केला आहे. त्यात महाराष्ट्रातील जनतेला १० रुपयांत भोजन देण्याचं प्रमुख वचन देण्यात आलं आहे. हाच धागा पकडून पवार यांनी आपल्या खास शैलीत शिवसेनेवर हल्लाबोल केला. 'युतीचं सरकार असताना शिवसेनेनं १ रुपयांत झुणका-भाकर ही योजना सुरू केली होती. मात्र, ही योजना कधी बंद झाली ते कळलंही नाही,' असं पवार म्हणाले. भाजपाध्यक्ष अमित शहा हे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सभा घेत आहेत. प्रत्येक सभेत ते कलम ३७० च्या मुद्द्यावरून काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका करत आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही त्यांचीच री ओढत आहेत. कलम ३७० ला विरोध करणाऱ्या पक्षांना मतदान करणार का, असा प्रश्न मतदारांना विचारत आहेत. त्यावरूनही पवार यांनी सेना-भाजपचा समाचार घेतला. 'कलम ३७० रद्द करण्याला आमचा पाठिंबाच आहे. मात्र, त्यांचा विनाकारण जप सुरू आहे. ३७० कलमावरून ओरडणारे ३७१ कलमावर गप्प का?,' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. वाचा: 'सत्तेवर आल्यानंतर अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचं स्मारक उभं करू, असं आश्वासन भाजपनं दिलं होतं. पण समुद्रात एक वीटही उभी राहिली नाही. उलट शिवछत्रपतींच्या काळात ज्या किल्ल्यांवर भवानी तलावर तळपली, त्या किल्ल्यांवर भाजप-शिवसेनेच्या काळात 'छमछम' बघावी लागेल अशी चिन्हे आहेत,' अशी खंत त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी मतदान होणार असून त्यासाठी ८ कोटी ९५ लाख ६२ हजार ७०६ मतदारांची नोंदणी झाली आहे. महाराष्ट्रात एकूण ९५,४७३ मतदान केंद्रं असून १.८ लाख ईव्हीएमचा मतदानासाठी वापर होणार आहे. असा आहे निवडणूक कार्यक्रम २७ सप्टेंबर : निवडणुकीची अधिसूचना ४ ऑक्टोबर : उमेदवारी अर्जासाठी मुदत ५ ऑक्टोबर : उमेदवारी अर्जांची छाननी ७ ऑक्टोबर : अर्ज मागे घेण्याची मुदत २१ ऑक्टोबर : मतदान २४ ऑक्टोबर : मतमोजणी