मुंबई: चर्नी रोड येथे इमारतीला आग; बचावकार्य युद्धपातळीवर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, October 13, 2019

मुंबई: चर्नी रोड येथे इमारतीला आग; बचावकार्य युद्धपातळीवर

https://ift.tt/2MxTgHY
मुंबई: चर्नी रोड येथील ड्रीमलँड सिनेमाजवळ एका निवासी इमारतीला आज सकाळी भीषण आग लागली. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत. इमारतीत अनेक जण अडकल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू आहे. मुंबईतील चर्नी रोड येथे ड्रीमलँड सिनेमाजवळील एका निवासी इमारतीला रविवारी सकाळी भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच काही वेळाने अग्निशमन दलाचे बंब आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. इमारतीमध्ये अनेक रहिवासी अडकले होते. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना सुखरुप बाहेर काढले. अजूनही बचावकार्य सुरू आहे. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे कारण समजू शकलेले नाही.