काश्मीर: द्रासमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, October 7, 2019

काश्मीर: द्रासमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

https://ift.tt/359VkOQ
द्रास (): जम्मू-काश्मीरमध्ये हिवाळा सुरू होण्यापूर्वी पाकिस्तानने अतिरेक्यांना पाठवण्यासाठी कंबर कसली आहे. पण सुरक्षा दलांच्या दक्षतेमुळे पाकिस्तानचे हे प्रयत्न धुळीला मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे. आपले प्रयत्न हाणून पाडले जात असल्याचे लक्षात आल्याने पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या घुसखोरीच्या वेगवेगळ्या मार्गांची चाचपणी सुरू केली आहे. अशाच प्रयत्नात असलेल्या दोन दहशतवाद्यांचा भारतीय लष्कराने सिंध खोऱ्यातील गुरेज सेक्टरमध्ये खात्मा केला. 6 वर्षांनंतर या भागात ही पहिलीच घुसखोरीची घटना उघडकीस आली आहे. याबाबत लष्करातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घुसखोरीची ही घटना २७ सप्टेंबर आणि ३ ऑक्टोबरला झाली. गेल्या काही वर्षे सिंध खोरे शांत होते. इथे शेवटचे दहशतवाद विरोधी अभियान ऑगस्ट २०१३ मध्ये राबवण्यात आले होते. नियंत्रण रेषेच्या सर्वच बाजूंनी दहशतवाद्यांनी भारतात घुसवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असल्याचे एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितले. या मुळे खोऱ्यातील जनता दहशतीखाली असून पाकिस्तानी दहशतवाद्यांपासून आपल्या जीवाला धोका असल्याची भीती लोकांना सतावत असल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले.