१ वर्षापासून बेपत्ता मुलगी पॉर्न साइटवर सापडली - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, October 27, 2019

१ वर्षापासून बेपत्ता मुलगी पॉर्न साइटवर सापडली

https://ift.tt/2PpuEnQ
फ्लोरिडा: वर्षभरापासून बेपत्ता असलेली किशोरवयीन मुलगी एका पॉर्न साइटमुळं सापडल्याची घटना अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये समोर आली आहे. या मुलीच्या आईला एका पॉर्न साइटवर तिचे फोटो आणि काही व्हिडिओ दिसले. त्यानंतर तिच्या आईनं याबाबत पोलिसांना माहिती दिली. तिचं अपहरण करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित किशोरवयीन मुलगी वर्षभरापासून बेपत्ता होती. एका पॉर्न साइटवर मुलीचे फोटो आणि काही व्हिडिओ असल्याचे आईच्या निदर्शनास आले. त्यानंतर तिनं याबाबत पोलिसांना माहिती दिली. न्यूयॉर्क पोस्टच्या माहितीनुसार, पोलिसांनी तपास केला असता, पॉर्नहब आणि अन्य वेबसाइटवर या मुलीचे साठहून अधिक अश्लील फोटो आणि व्हिडिओ सापडले. या मुलीचं अपहरण करणाऱ्या तरूणालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. एका वृत्तानुसार, काही अश्लील व्हिडिओमध्ये ही मुलगी तरुणासोबत दिसत होती. क्रिस्टोफर जॉनसन असं या तरूणाचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. फेब्रुवारीत या तरूणानं मुलीचं अपहरण केलं होतं असं सांगितलं जातं. मुलीसोबत सेक्स करतानाचे व्हिडिओ त्याने तयार केले होते. तिचे अश्लील फोटोही तो काढत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. पीडितेच्या आईनं पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. आरोपी तरुणाच्या कारची माहिती मिळाली. त्यानंतर सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्यासोबत अपहृत मुलगीही होती. एका क्लीनिकमधून आरोपी राहत असलेल्या घराचा पत्ता मिळाला. तरुणापासून गरोदर राहिल्याचं मुलीनं सांगितलं. गर्भपातासाठी त्यानं क्लिनीकमध्ये नेल्याची माहितीही तिनं दिली. मात्र, आरोपीनं सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.