'हाउसफुल ४'ने दुसऱ्या दिवशी कमावले १८ कोटी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, October 27, 2019

'हाउसफुल ४'ने दुसऱ्या दिवशी कमावले १८ कोटी

https://ift.tt/2PmSD77
मुंबई: अक्षय कुमार, बॉबी देओल, रितेश देशमुख अशा कलाकारांची मांदियाळी असलेला '' हा चित्रपट बॉक्सऑफिसवर प्रचंड गर्दी खेचतो आहे. प्रदर्शनानंतरच्या दुसऱ्या दिवशी 'हाउसफुल ४'नं तब्बल १८ कोटींची कमाई केली आहे. 'हाउसफुल' कॉमेडी सीरिजमधील हा सर्वात बेस्ट ओपनिंग देणारा सिनेमा ठरला आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या आकडेवारीनुसार, पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी 'हाउसफुल'च्या कमाईत ५ ते १० टक्क्यांची वाढ झाली आहे. दिवाळीच्या सेलिब्रेशनचा चित्रपटाच्या कमाईवर काहीही परिणाम झालेला नसून उलट फायदाच झालेला दिसत आहे. महाराष्ट्र व बिहारमध्ये चित्रपटाचं कलेक्शन पहिल्या दिवशीच्या तुलनेत घसरलं आहे. गुजरात, सौराष्ट्रमध्ये हा चित्रपट गर्दी खेचत आहे. पुढच्या काही दिवसांत देखील हाच ट्रेंड कायम राहील असा अंदाज आहे. उत्तर भारत विशेषत: दिल्ली शहर व आसपासच्या उपनगरांकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. पहिल्या दोन दिवसांत 'हाउसफुल ४'नं ३६.५० कोटींचा गल्ला जमवला आहे. रविवारी हा आकडा ५० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. चित्रपटाच्या कमाईचा खरा आकडा सोमवारनंतर समजणार आहे. कारण, सोमवार हा देखील सुट्टीचा दिवस आहे. 'हाउसफुल ४' समीक्षकांनी चांगलंच झोडपलं आहे. त्याचा परिणाम चित्रपटाच्या एकूण व्यवसायावर होण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन फरहाद सामजी यांचं आहे. अक्षय, रितेश आणि बॉबी देओलसोबत या चित्रपटात कृती सेनन, कृती खरबंदा आणि पूजा हेगडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.