पीएम मोदींची समुद्र किनाऱ्यावर 'स्वच्छता मोहीम' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, October 12, 2019

पीएम मोदींची समुद्र किनाऱ्यावर 'स्वच्छता मोहीम'

https://ift.tt/2M7H5m2
महाबलीपूरमः पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्या कार्यकाळात यांनी देशभरात मोहीम राबवली होती. स्वच्छता मोहीम राबवण्यसाठी ते स्वतः रस्त्यावर उतरताना अनेकदा दिसले आहेत. आज पुन्हा एकदा समुद्राच्या किनाऱ्यावर कचरा दिसताच मोदींनी स्वच्छता मोहीम राबवली. मोदी इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी हा व्हिडिओ शेअर करीत सार्वजनिक स्थळावर सर्वांनी कचरा करू नये, स्वच्छता राखल्यास आरोग्य चांगले राहते, असे लोकांना आवाहन केले. महाबलीपूरमधील समूद्र किनाऱ्यावर पडलेला कचरा एका पिशवीत भरून या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवताना मोदी दिसले आहेत. हा व्हिडिओ स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे. पंतप्रधान मोदी आज सकाळी समुद्र किनाऱ्यावर फेरफटका मारण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी त्यांना कचरा दिसला. त्यामुळे त्यांनी इतराना न सांगता स्वतःच सफाई करण्याचे ठरवले. समुद्र किनाऱ्यावर पडलेला कचरा त्यांनी एका पिशवीत भरायला सुरुवात केली. समुद्र किनारा स्वच्छ दिसायला हवा, असे मोदींनी नेहमी आपल्या भाषणातून सांगितले आहे. समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवल्यानंतर मोदींनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी म्हटले, आज सकाळी ममल्लापूरम (महाबलीपूरम) च्या समूद्र किनाऱ्यावर स्वच्छता केली. हे काम ३० मिनिटे केले. एकत्र केलेल कचरा मी हॉटेलच्या स्टाफकडे दिला. सार्वजनिक स्थळी स्वच्छता राखणे हे आपले सर्वाचे काम आहे. स्वच्छता असल्यास आपले आरोग्य निरोगी राहते, असे मोदींनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या अनौपचारिक भेटीसाठी महाबलीपूरम येथे पोहोचले आहे. जिनपिंग हे दोन दिवसांच्या भारत भेटीवर आले आहे. शुक्रवारी रात्री दोन्ही नेत्यांत बैठक पार पडली. रात्री भोजनावेळी दोन्ही नेत्यांनी जवळपास अडीच तास चर्चा केली. या बैठकीत दहशतवाद, कट्टरतावाद, व्यापर या वर चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल शी जिनपिंग यांचे स्वागत करण्यासाठी खास तामिळनाडूमधील पेहराव वेष्टी (लुंगी), पांढरा शर्ट परिधान केला होता. यानंतर मोदींनी त्यांना प्राचीन शहर प्रसिद्ध स्थळ ‘अर्जुन तपस्या स्मारक’, ‘नवनीत पिंड’ (कृष्णा बटर बॉल), ‘पंच रथ’ आणि ‘शोर मंदिर’ येथे फेरफटका मारला होता.