कमलनाथांच्या भाच्याने रात्रीत उडवले ८ कोटी ₹ - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, October 20, 2019

कमलनाथांच्या भाच्याने रात्रीत उडवले ८ कोटी ₹

https://ift.tt/2VZxFfH
नवी दिल्ली: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा भाचा याचा राजेशाही थाट काय आहेत याचा अंदाज मनी लाँड्रिंग प्रकरणात त्याच्या विरोधात सक्तवसुली संचालनायलने () दाखल केलेल्या ावरून सहज लावता येतो. या प्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, पुरीने अमेरिकेतील एका नाइटक्लबमध्ये एका रात्री ११ लाख डॉलर्स, म्हणजेच ७ कोटी ८ लाख रुपये उडवले होते. ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये पुरीसह त्याचे सहकारी आणि मोजर बेयर इंडिया ( प्रायव्हेट) लिमिटेडचेही नाव आहे. एका रात्रीत नाइटक्लबमध्ये उडवले ७.८ कोटी रुपये ईडीने रतुल पुरी याच्या विरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, रतुल पुरी परदेशातील अनेक हॉटेलांमध्ये थांबला होता हे त्याने केलेल्या पैशांच्या व्यवहारांची पडताळणी करण्यात आल्यानंतर स्पष्ट झाले आहे. या दरम्यान अमेरिकेतील प्रोव्होकेटर नावाच्या एका नाइट क्लबमध्ये एकाच रात्री ७ कोटी ८ लाख रुपये उडवल्याचे निष्पन्न झाले आहे. या बरोबरच नोव्हेंबर २०११ आणि ऑक्टोबर २०१६ च्या दरम्यान पुरीने स्वत:च्या मौजमजेसाठी सुमारे ३२ कोटी रुपये खर्च केल्याचे निष्पन्न झाले आहे. मनी लाँड्रिंगसाठी निर्माण केल्या बनावट कंपन्या आरोपपत्रात नमूद केलेल्या माहितीनुसार, पुरीने मनी लाँड्रिंगमध्ये सुमारे ८ हजार कोटी रुपयांचा व्यवहार केला आहे. मोजर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड बँकांकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम आपल्या कंपन्यांकडे वळती केल्याचा दावा ईडीने केला आहे. या व्यवहारासाठीच बनावट कंपन्या बनवल्या गेल्या. पैसे वळते करण्यात आलेल्या अशा १२ कपन्यांच्या नावांचा उल्लेख ईडीने आरोपपत्रात केला आहे. ईडीने दाखल केले ११० पानी आरोपपत्र ईडीने दिल्लीच्या न्यायालयात एकूण ११० पानी आरोपपत्र दाखल केले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मोजर बेयर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने आपल्या विविध कंपन्यांमध्ये ८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचा स्पष्ट उल्लेख या आरोपपत्रात करण्यात आला आहे.