रोहित शर्मानं कसोटीत झळकावलं पहिलं द्विशतक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, October 20, 2019

रोहित शर्मानं कसोटीत झळकावलं पहिलं द्विशतक

https://ift.tt/2qmSW7o
रांची: भारतीय संघाचा सलामीवीर यानं रांचीमध्ये कसोटी कारकिर्दीतील पहिलं द्विशतक झळकावलं. त्यानं २५५ चेंडूंमध्ये २१२ धावा कुटल्या. यात सहा षटकार आणि २८ चौकारांचा समावेश आहे. तिसऱ्यांदा त्यानं दीडशतकी खेळी केली आहे. याआधी १७७ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. पदार्पणाच्या कसोटी सामन्यात त्यानं ही खेळी केली होती. रोहित शर्माने २५५ चेंडूंत २१२ धावा केल्या. त्यात सहा षटकार आणि २८ चौकार आहेत. ही त्याची कसोटी कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या आहे. रांचीत दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्यानं द्विशतक पूर्ण केलं. हे त्याचं पहिलंच द्विशतक आहे. तिसऱ्यांदा त्यानं १५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. याआधी १७७ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. तत्पूर्वी, भारतीय संघाच्या पहिल्या डावाची सुरुवात अडखळत झाली होती. अवघ्या ३९ धावांवर संघाचे आघाडीचे तीन फलंदाज बाद झाले होते. मात्र, रोहित शर्मानं अजिंक्य रहाणेच्या साथीनं जबरदस्त फलंदाजी केली. त्यानं ८६ चेंडूंतच अर्धशतक साजरं केलं. तर शतक पूर्ण करण्यासाठी त्यानं १३० चेंडूंचा सामना केला. त्यानं पहिल्या दिवशीच शतक पूर्ण केलं होतं. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ अंधुक प्रकाशामुळं काही वेळ थांबवण्यात आला होता. त्यावेळी रोहित शर्मा ११७ धावांवर, तर रहाणे ८३ धावांवर खेळत होता. या दोघांनीही दुसऱ्या दिवशीही डावाची सुरुवात केली. दुसऱ्या दिवशीही त्यांनी मैदानावर वर्चस्व गाजवलं. रोहित शर्मानं द्विशतक साजरे केले तर अजिंक्य रहाणेनं शतकी खेळी केली. षटकारानं साजरं केलं द्विशतक रहाणे दुसऱ्या दिवशी ६९ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर एक धाव घेऊन शतक साजरं केलं. तर रोहित शर्मानं १९९व्या चेंडूंवर एक धाव घेऊन दीडशे धावा पूर्ण केल्या. रोहितनं कसोटी कारकिर्दीतील पहिलं द्विशतक पूर्ण करण्यासाठी २४९ चेंडू खेळून काढले. एन्गिडीच्या ८८व्या षटकातील पहिल्या चेंडूवर त्यानं उत्तुंग षटकार ठोकून हे द्विशतक झळकावलं. एका कसोटी मालिकेत दोन वेळा दीडशतकी खेळी किंवा त्यापेक्षा अधिक धावा त्यानं केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अशी कामगिरी करणारा रोहित पहिला फलंदाज आहे. २१२ धावांवर झाला बाद द्विशतक पूर्ण केल्यानंतर एन्गिडीच्या याच षटकात त्यानं दुसरा षटकार खेचला. त्यानंतरच्या रबाडाच्या षटकात षटकार ठोकण्याच्या नादात त्यानं आपली विकेट गमावली. एन्गिडीनं सीमारेषेजवळ त्याचा झेल टिपला. रोहितनं २५५ चेंडूंत २८ चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीनं २१२ धावा केल्या. रोहित आणि जडेजा यांनी पाचव्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी रचली. मालिकेत ५०० पेक्षा अधिक धावा या मालिकेत रोहितनं तिसरं शतक झळकावलं आहे. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात २१२ धावा करणाऱ्या रोहितच्या आता एकूण ५२९ धावा झाल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज होण्याचा मान त्यानं मिळवला आहे. त्यानं माजी कर्णधार अझहरुद्दीनलाही मागे टाकले आहे. त्याच्या नावावर ३८८ धावा होत्या. रोहित शर्मानं या कसोटी मालिकेत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा, सर्वाधिक तीन शतके, सर्वाधिक चौकार आणि सर्वाधिक षटकार लगावण्याचा पराक्रम त्यानं केला आहे. आता ३० कसोटी सामन्यांत रोहितच्या नावावर एकूण सहा शतके झाली आहेत. तसंच १० अर्धशतके त्याने झळकावली आहेत.