शिवसेनेच्या वचननाम्यात 'आरे'चा उल्लेखही नाही - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, October 12, 2019

शिवसेनेच्या वचननाम्यात 'आरे'चा उल्लेखही नाही

https://ift.tt/33o1bhN
मुंबईः 'आरे'तील वृक्षतोडीला शिवसेनेचा विरोध आहेच. पण एकट्या शिवसेनेच्याविरोधाने काहीही होणार नाही. सर्वपक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. पण 'आरे'बाबत शिवसेनेने आपल्या वचननाम्यात कुठलाही उल्लेख केलेला नाही. विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज मुंबईत मातोश्री येथे शिवसेनेचा वचननामा जाहीर करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकरांच्या प्रश्नांना उत्तर दिलं. शिवसेनेच्या वचननाम्यात 'आरे'बाबत कुठलाही उल्लेख नसल्याने उद्धव ठाकरे यांना यावेळी प्रश्न विचारण्यात आला. 'आरे'चा विषय मुंबईकरांसह सर्वपक्षांशी संबंधित आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी आरेबाबत आली भूमिका स्पष्ट करावी. शिवसेनेने 'आरे'तील मेट्रो कारशेडसाठी होणाऱ्या वृक्षतोडीला विरोध केलेला आहे आणि तो पुढेही राहणारच. परंतु, एकट्या शिवसेनेला जबाबदार धरण्याऐवजी सर्वपक्षांना विचारा. मग शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीसह इतर पक्षाच्या नेत्यांना उभं करा आणि एकदा आरेवर चर्चा घडवा. आमची तयारी आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.