प्रत्येक भाषणात PMC घोटाळ्यावर बोलणार: राज - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, October 12, 2019

प्रत्येक भाषणात PMC घोटाळ्यावर बोलणार: राज

https://ift.tt/31cB8Zj
मुंबई: आर्थिक गैरव्यवहारामुळं निर्बंध लादण्यात आलेली पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (पीएमसी) खातेदारांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांची भेट घेतली. खातेदारांनी आपापल्या अडचणींचा पाढा राज यांच्यापुढं वाचला आणि मदतीची विनंती केली. खातेदारांच्या समस्यांबाबत आवाज उठविण्याचं व निवडणूक प्रचारातील प्रत्येक भाषणात या घोटाळ्यावर बोलण्याचं आश्वासन राज यांनी यावेळी दिलं. वाचा: पीएमसी बँकेतून पैसे काढण्यावर सध्या निर्बंध आहेत. त्यामुळं खातेदार हवालदील झाले आहेत. कुणाला आपल्या मुलाबाळांची लग्नकार्यं पुढं ढकलावी लागली आहेत. तर, कुणाला दागिने गहाण ठेवून जगण्याची वेळ आली आहे. राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत हा मुद्दा लावून धरला आहे. प्रत्येक सभेत पीएमसी बँकेच्या घोटाळ्यावरून राज ठाकरे सत्ताधारी नेत्यांना धारेवर धरत आहेत. पीएमसी बँकेच्या संचालक मंडळावर भाजपचेच नेते आहेत हे राज जाहीरपणे सांगत आहेत. मनसेच्या या भूमिकेमुळं अपेक्षा उंचावलेल्या खातेदारांनी आज त्यांची भेट घेतली. वाचा: राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे व मनसेचे नेते बाळा नांदगावकर यावेळी उपस्थित होते. राज यांनी शांतपणे खातेदारांचे म्हणणे ऐकून घेतले. तसंच, त्यांना या प्रश्नी पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं. खातेदारांच्या भेटीनंतर शर्मिला ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला. 'पीएमसीच्या खातेदारांच्या समस्यांकडं सरकार का लक्ष देत नाही? सिटी बँकेतही असेच गैरप्रकार सुरू आहेत. मात्र, त्याबद्दल कोणी बोलतही नाही. सिटी बँकेच्या संचालक मंडळावर शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ आहेत. त्यांच्यावर खटला का दाखल केला जात नाही,' असा प्रश्न शर्मिला यांनी सरकारला केला. 'पीएमसी घोटाळ्यावर मी प्रत्येक भाषणात बोलतोच आहे. यापुढंही बोलत राहीन आणि निवडणुकीनंतर या प्रश्नी पाठपुरावा करेन,' असा शब्द राज यांनी खातेदारांना दिल्याचं शर्मिला यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्र्यांपुढं निदर्शने पीएमसी बँकेच्या खातेदारांचा रोष दिवसेंदिवस वाढतच असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही त्याचा फटका बसला. निवडणूक प्रचारासाठी ठाण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांसमोर खातेदारांनी निदर्शनं केली. तसंच, घोटाळेबाजांच्या अटकेची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी निदर्शकांची भेट घेऊन कारवाईचे आश्वासन दिले. तसंच, पंतप्रधानांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती करेन, असंही स्पष्ट केलं.