
मुंबई: सन १९६२ सालापासून आतापर्यंत झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठे मताधिक्य मिळवण्याचा विक्रम भारतीय जनता पक्षात डेरेदाखल झालेले नवी मुंबईतील दिग्गज नेते यांच्या नावावार आहे. आतापर्यंत झालेल्या एकूण १२ विधानसभा निवडणुकांमध्ये एकूण ३३९६ उमेदवार आमदार बनले. मात्र, गणेश नाईक यांचे मताधिक्य अजूनही कुणी तोडू शकलेले नाही. इतकेच नाही, तर त्यांनी प्रस्थापित केलेला विक्रम तोडणेही अशक्य असल्याचे बोलले जात आहे. वाचा- आतापर्यंत निवडले गेले ३३९६ आमदार महाराष्ट्र विधानसभेची पहिली निवडणूक सन १९६२ मध्ये झाली. तेव्हा पासून आतापर्यंत राज्यात एकूण १२ विधानसभा निवडणूका झाल्या. या निवडणुकांमध्ये ४४ राजकीय पक्षांचे ३३९६ उमेदवार निवडून आलेय. या सर्व आमदारांमध्ये सर्वाधिक काँग्रसच्या आमदारांची संख्या होती. काँग्रेसचे एकूण १६०७ आमदार झाले. दुसऱ्या स्थानावर आहे भारतीय जनता पक्ष. भाजपचे आतापर्यंत एकूण ४१५ आमदार झाले. यानंतर शिवसेनेचे ३६४ आमदार, शेतकरी कामगार पक्षाचे १०४ आमदार, जनता पक्षाचे ११९ आमदार विधानसभेत पोहोचलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे २३२ आणि तितकेच अपक्ष आमदार विधानसभेत पोहोचले आहेत. सन १९६२ पासून ते सन २०१४ पर्यंत एकूण ३००३८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.
हा सर्वात मोठा विजय महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात नवी मुंबईचे गणेश नाईक यांना जेवढी मते मिळाली आहेत, तेवढी मते आतापर्यंत कोणत्याही इतर उमेदवाराला मिळालेली नाहीत. सन २००४ मधील विधानसभा निवडणुकीत गणेश नाईक यांनी बेलापूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत त्यांना ३२४७०६ इतकी मते मिळाली होती. नाईक यांनी आपलाच विक्रम मोडला होता. वाचा- सन १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत गणेश नाईक यांनी शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्या वेळी त्यांना २ लाखांपेक्षा अधिक मते मिळाली होती. गणेश नाईक यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही उमेदवाराला दोन लाखांपेक्षा अधिक मते मिळालेली नाहीत. सर्वात कमी मते मिळवत विजयी होणाचा विक्रम जयराम शेटे यांच्या नावे आहे. सन १९६२ ची निवडणूक लढलेल्या शेटे यांना एकूण ६२११ मते मिळाली होती. वाचा-