मलाही राग येतो, कधी नाचावंसंही वाटतं: धोनी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, October 17, 2019

मलाही राग येतो, कधी नाचावंसंही वाटतं: धोनी

https://ift.tt/2VMYwM9
वृत्तसंस्था, नवी दिल्ली म्हणजे गुढ व्यक्तिमत्व. त्याच्या मनात काय चालले आहे याचा अंदाज कुणीच बांधू शकत नाही. मुळात खेळाडू म्हणून सध्या तरी तो आपले विचार, मते कायम खासगीत ठेवतो. वनडे वर्ल्डकपनंतर त्याने बीसीसीआयकडून सुटी मागून घेतली. तो लष्कराच्या सेवेत रुजू झाला. दरम्यान त्याच्या निवृत्तीबाबत चर्चा झाली; पण त्याने याबाबत काही न बोलणे पसंत केले. बुधवारी तो बऱ्याच महिन्यांनी मीडियापुढे आला. निमित्त होते एका जाहिरातीच्या कार्यक्रमाचे. मात्र यावेळीही त्याने आपल्या निवृत्तीबाबत बोलण्यापेक्षा आठवणींना उजळा देत आपल्या विचारसरणीवरही भाष्य केले. या संवादादरम्यान त्याने २००७मध्ये भारताने जिंकलेल्या पहिल्या-वहिल्या वर्ल्ड टी-२० स्पर्धेच्या जेतेपदाच्या प्रवासातील एक सुखद आठवण सांगितली. पाकिस्तानविरुद्धच्या गट लढतीमधील ‘बोल आऊट’ संस्मरणीयच. याबाबत धोनीने सांगितलेली आठवण, संघाच्या चोख योजनाची प्रचिती देते. ‘त्या वर्ल्डकपमध्ये ‘बोल आऊट’ असणार होते. ज्याची कल्पना प्रत्येक संघाप्रमाणे आम्हालाही होती. त्यानुसार आम्ही सरावाला सुरुवात केली होती. सरावाला सुरुवात होण्याआधी प्रत्येक खेळाडू ‘बोलआऊटचा’ सराव करत असे. त्यावरून कोणी कितीवेळा यष्ट्या उडवल्या, त्याचे टिपण करून ठेवले जाई. जे खेळाडू अधिक चोख होते. त्यांनाच वेळ आली की संधी द्यायची असे ठरले. मग तो चोख बोल आऊट करणारा गोलंदाज नसला तरी चालेल’, त्या आठवणी जागवताना धोनी आजही त्या सरावाच्या पद्धतीबाबत निर्धाराने बोलतो. ‘बोल आऊटचा सराव तसा मजेशीर वाटे. गंमत येई... त्या आनंदानेच आम्हाला बोल आऊटच्या कलेत माहीर केले. बोल आऊट म्हटले की ती फक्त गोलंदाजांचीच मक्तेदारी नाही, हा मुद्दा आमच्यासाठी स्पष्ट होता. त्यामुळे आम्ही नेहमी बोल आऊटचा सराव करत होतो’, असे धोनीने सांगितले. धोनीचे बोल... -ज्या क्षणाला सामोरे जात आहोत, त्यावेळी कशी कृती अपेक्षित आहे हे महत्त्वाचे आहे. हा विचार कायम मनात असल्याने मी वाहवत जात नाही. आहे त्या परिस्थितीचा नेटाने सामना करायचा हेच ठाऊक असते.