स्वप्न पाहण्यातच यांची ४ वर्ष निघून जातील; संजय राऊतांचा दानवेंना टोला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, November 24, 2020

स्वप्न पाहण्यातच यांची ४ वर्ष निघून जातील; संजय राऊतांचा दानवेंना टोला

https://ift.tt/397D2lO
मुंबई : पुढच्या दोन ते तीन महिन्यात भाजपचं सरकार येईल, असा दावा केंद्रीय राज्यमंत्री यांनी केल्यानंतर त्याला आता शिवसेना खासदार यांनी उत्तर दिलंय. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात हे सरकार पाच वर्ष निश्चित पूर्ण करणार आहे. यांची पुढची चार वर्ष फक्त स्वप्न पाहण्यातच निघून जाणार आहेत, असंही संजय राऊत म्हणाले. राज्यात जे ८० तासांचं सरकार स्थापन झालं होतं त्याची आज पुण्यतिथी आहे. आता त्यांना तीन महिन्यात सरकार स्थापन करायचं असेल तर शुभेच्छा. स्वप्न पाहण्यातच यांची चार वर्ष निघून जाणार आहेत, असा टोला राऊतांनी लगावला. 'महाविकास आघाडीचं सरकार मजबूत असून आम्ही पाच वर्ष पूर्ण करणार आहोत. राज्यातील जनता महाविकास आघाडीसोबत आहे. संपूर्ण देशाचा विचार करता सर्वात मजबूत सरकार महाराष्ट्रात आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात सरकार चांगलं काम करत आहे', असं संजय राऊत म्हणाले. काय म्हणाले दानवे? पुढच्या दोन ते तीन महिन्यात राज्यात भाजपचं सरकार असेल, असं वक्तव्य दानवेंनी केली. ते परभणीत पदवीधर निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलत होते. आपलं सरकार कधी येणारच नाही, असा विचार करू नका. पुढच्या दोन ते तीन महिन्यातच आपलं सरकार स्थापन होईल. आपण फक्त विधानपरिषद निवडणुका पार पडण्याची वाट पाहत आहोत, असं दानवे म्हणाले. माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते यांनी स्थापन केलेल्या अल्पावधीच्या सरकारला काल एक वर्ष पूर्ण झालं. त्यानिमित्ताने सर्वच नेत्यांनी यावर भाष्य केलं. भाजप नेतेही सध्या पदवीधर निवडणुकीत यावर भाष्य करत असून आमचं सरकार पुन्हा येणार असल्याचा दावा करत आहेत. ८० तासांचं सरकार कोसळल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून २८ नोव्हेंबरला शपथ घेतली होती. यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार देण्यात आला. भाजपने विधानसभा निवडणुकीत युतीमध्ये निवडणूक लढत १०५ जागा जिंकल्या होत्या. तर शिवसेनेला ५६ जागा जिंकून आणता आल्या. राष्ट्रवादीने ५४ आणि काँग्रेसने ४४ जागा जिंकल्या होत्या.