विराट, मयांकचे 'रन बरसे'; सचिनचा स्तुतीवर्षाव - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, October 11, 2019

विराट, मयांकचे 'रन बरसे'; सचिनचा स्तुतीवर्षाव

https://ift.tt/2OE1yAB
मुंबई: दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीनं द्विशतक झळकावलं आहे. त्यानं अडिचशे धावा पूर्ण केल्या आहेत. तर मयांक अग्रवालनंही शतकी खेळी केली आहे. पुण्याच्या मैदानावर धावांचा पाऊस पाडणाऱ्या विराट आणि मयांकवर महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं स्तुतीवर्षाव केला आहे. विराट कोहलीनं पुण्याच्या मैदानावर अडिचशे धावांचा टप्पा पार केला आहे. पहिल्या कसोटीतही दमदार कामगिरी करणाऱ्या मयांक अग्रवालनं शतक झळकावलं आहे. या दोघांनीही धावांचा पाऊस पाडला आहे. मास्टर-ब्लास्टर यानं ट्विट करून आणि मयांकचं कौतुक केलं आहे. 'द्विशतक झळकावणारा विराट कोहली आणि शतकी खेळी करणाऱ्या मयांक अग्रवालचे अभिनंदन...तुम्ही खूप छान खेळलात. असंच खेळत राहा!...' असं सचिननं म्हटलं आहे. दरम्यान, पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरू असलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस आज विराटनं गाजवला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या विराटनं चौफेर फटकेबाजी करत द्विशतकी खेळी केली. द्विशतकानंतर अधिक आक्रमक खेळ करून त्यानं अडिचशे धावांचा टप्पाही पार केला. वाचा: ब्रॅडमन यांचा दीडशतकांचा विक्रम मोडल्याची चर्चा सुरू असतानाच विराटनं २०० धावा पूर्ण करून नव्या विक्रमाला गवसणी घातली. विराटनं सचिन व सेहवागचा कसोटी द्विशतकांचा विक्रम मोडला आहे. सचिन व सेहवागच्या नावावर कसोटीत सहा द्विशतकं आहेत. सचिननं २०० कसोटी सामने खेळताना ३२९ डावांमध्ये तर, सेहवागनं १०४ कसोटी सामन्यांत १८० डावांमध्ये ही कामगिरी केली होती. विराटनं अवघे ८१ कसोटी सामन्यांतील १३८ डावांमध्ये हा पराक्रम केला आहे. भारतीय संघाचा कर्णधार म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही विराटच्या नावावर नोंदला गेला आहे. त्यानं सुनील गावसकर यांना मागे टाकलं आहे. गावसकर यांच्या नावावर २४२६ धावांची नोंद आहे. कारकिर्दीतील ५० व्या कसोटीत शतक ठोकण्याचा मानही विराटला मिळाला आहे. आतापर्यंत स्टीफन फ्लेमिंग, अलिस्टर कुक आणि स्टीव्ह वॉ यांनी त्यांच्या ५० व्या कसोटीत शतक ठोकलं आहे. विराटलाही आता त्या यादीत स्थान मिळालं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणाऱ्यांच्या यादीत विराट सध्या दुसऱ्या स्थानी आहे. विराटनं एकूण २६ शतके ठोकली असली तरी कर्णधार म्हणून त्यांच्या नावावर १९ कसोटी शतके आहेत. या यादीत ग्रॅहम स्मिथ २५ शतकांसह पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर रिकी पाँटिंग (१९) अॅलन बॉर्डर (१५) आणि स्टीव्ह स्मिथ (१५) चा क्रमांक लागतो.