ठाणे: ठाणे ते कल्याणदरम्यान असलेल्या पारसिक बोगद्याजवळ सीएमएमटीकडे येणाऱ्या रेल्वे मार्गावर रेल्वे रुळाला तडे गेल्याने सीएसएमटीकडे येणारी मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. या मुळे सीएसएमटीकडे जाणारी जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आली आहे. दरम्यान, दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना याचा काहीसा फटका बसला आहे. पारसिक बोगद्याजवळील रुळ दुरुस्तीचे काम सुरू असून लवकरच ही वाहतूक पूर्ववत होईल असे रेल्वेने म्हटले आहे.