भविष्यात शिवसेनेला आणखी समर्थन मिळेल: राऊत - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, October 27, 2019

भविष्यात शिवसेनेला आणखी समर्थन मिळेल: राऊत

https://ift.tt/36c5q23
मुंबई: शिवसेनेला आतापर्यंत ४ आमदारांचा पाठिंबा मिळाला असून काही दिवसात अनेक आमदार शिवसेनेला पाठिंबा जाहीर करतील, राज्यातील सत्तेच्या कॅनव्हासवर रंग भरण्यासाठी ब्रश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाच हातात आहे, अशा शब्दात शिवसेनेचे नेते यांनी राज्यातील सत्तास्थापनेच्या रिमोट कंट्रोल शिवसेनेच्या हातात असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. भविष्यात शिवसेनेला आणखी समर्थन मिळणार आहे, असेही संजय राऊत यांनी जाहीर केले आहे. शिवसेनेला आतापर्यंत ४ आमदारांनी पाठिंबा दिला असून या मुळे शिवसेनेचे विधानसभेतील संख्याबळ ५६वरून ६० वर गेले आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि या नाशिक पूर्व मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागलेले बाळासाहेब सानप यांनी आज मातोश्री येथे शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ आपल्या मनगटावरून काढून टाकलेल्या बाळासाहेब सानप यांना शिवबंधन बांधले. बाळासाहेब सानप यांनी बांधले शिवबंधन आता पर्यंत समाजकारण आणि राजकारण करत असताना आपल्याला बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद मिळाले आहेत. मी कोणत्याही पक्षात असलो तरी माझी चांगले संबंध शिवसेनेशीच होते, भाजप शिवसेना युती झाल्यामुळे आपल्याला तिकीट मिळू शकले नाही, असे सानप यांनी शिवबंधन बांधल्यानंतर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. सानप यांच्यामुळे शिवसेनेला उत्तर महाराष्ट्रात बळकटी मिळेल- राऊत बाळासाहेब सानप यांच्या शिवसेना प्रवेशामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेला बळकटी मिळेल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. सानप हे आमच्यासाठी नवीन नाहीत, यापुढे ते शिवसेनचा भगवा झेंडा हातात घेऊन काम करतील असेही राऊत म्हणाले.