
नवी दिल्ली: आपली इलेक्ट्रिक एययूव्ही Nexon EV पुढील वर्षी जानेवारी ते मार्च मध्ये लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने गुरुवारी ही घोषणा केली की भारतात इलेक्ट्रिक नेक्सॉन पुढील आर्थिक वर्ष २०१९-२०२० च्या चौथ्या तिमाहीत लाँच करणार आहे. ही टाटाची पहिली असणार आहे, ज्यात कंपनी Ziptron टेक्नॉलॉजीचा वापर करणार आहे. आपल्या मागील महिन्यातच झिपट्रॉन टेक्नॉलॉजी सादर केली. टाटाने अद्याप इलेक्ट्रिक नेक्सॉनचे जास्त डिटेल्स शेअर नाही केले आहेत. ही कार एकदा पूर्ण चार्ज केली तर ३०० कि.मी. पर्यंत चं अंतर पार करू शकेल, असा कंपनीचा दावा आहे. या गाडीची किंमत १५ ते १७ लाख रुपयांच्या मध्ये राहण्याची अपेक्षा आहे. नेक्सॉन इलेक्ट्रिकने पॉवरट्रेन 'झिपट्रॉन'ला देशाच्या क्लायमेट आणि वाहतुकीची परिस्थिती लक्षात घेऊन विकसित केले आहे. सोबतच, या गाडीचा परफॉर्मन्स, रेंज आणि सेफ्टीकडेही विशेष लक्ष दिलं आहे. या गाडीच्या बॅटरी पॅकमध्ये अॅडव्हान्स्ड लिथियम आयर्न सेल दिले आहेत. सोबत ऑपरेटिंग टेंपरेचर म्हणजे गाडी ज्या तापमानावर चालवली जाईल ते तापमान योग्य राखण्यासाठी लिक्विड कूलिंगची देखील सोय केली आहे. बॅटरी आणि मोटर वर ८ वर्षांची वॉरंटी साधारणपणे जास्त तापमान असण्याच्या स्थितीत बॅटरी सिस्टीमच्या परफॉर्मंसवर परिणाम होतो. झिपट्रॉनमध्ये दिलेला बॅटरी पॅक खूपच मजबूत स्टील कव्हरमध्ये आहे. यापासून IP67 रेटिंग मिळते. IP67 रेटिंग म्हणजे असं की हे जास्त वॉटरप्रूफिंग आणि डस्ट प्रोटेक्शन देतं. टाटा मोटर्स झिपट्रॉन टेक्नॉलॉजी असलेल्या आपल्या इलेक्ट्रिक कार्सच्या बॅटरीवर आणि मोटरवर आठ वर्षांची वॉरंटी देणार आहे. इलेक्ट्रिक एक्सयूव्ही ३०० शी होणार टक्कर इलेक्ट्रिक नेक्सॉनव्यतिरिक्त झिपट्रॉन टेक्नॉलॉजीचा वापर अल्टॉज ईव्ही आणि अपडेटेड टिगोर ईव्ही मध्येही होणार आहे. भारतीय बाजारात इलेक्ट्रिक नेक्सॉनची टक्कर इलेक्ट्रिक महिंद्रा एक्सयूव्ही ३०० शी होणार आहे. महिंद्रा एक्सयूव्ही ३०० वर्ष २०२० च्या दुसऱ्या सहामाहीत लाँच होण्याची शक्यता आहे.