
विशाखापट्टणम: विशाखापट्टणम कसोटीच्या ५ व्या आणि शेवटच्या दिवसाचा खेळ सुरू आहे. ३९५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ आज मैदानात उतरला आहे. आफ्रिका संघाने आज ११/१ च्या स्कोअरसह आपल्या खेळाला सुरवात केली. आजचा खेळ सुरू होताच आफ्रिकेने दोन गडीही गमावले. लंच ब्रेकमध्ये टीम आफ्रिका ११७/८ वर पोहोचली आहे. सध्या मुथुस्वामी 19 धावांवर आणि डॅन पीट ३२ धावांवर खेळत आहेत. रवींद्र जडेजाने चार गडी बाद केले आहेत. दिवसाचा पहिला बळी रविचंद्रन अश्विनने थेनिस डे ब्रूयनला तंबूत धाडत केली. अश्विनचा कसोटी क्रिकेटमधील हा ३५० वा बळी होता. हा बळी मिळवत अश्विनने सर्वात वेगवान ३५० बळींच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. अश्विनने हा बळी मिळवल्यानंतर मोहम्मद शमीने तेन्बा बावुमा याला खातेही उघडू न देता तंबूचा रस्ता दाखवला. आतापर्यंत ४ खेळाडू शून्यावर आऊट दक्षिण आफ्रिकेने १०० धावा पूर्ण केल्या आहेत. ३८ षटकांच्या समाप्तीनंतर संघाचा स्कोअर आहे १०५/८. चौथ्या डावात दक्षिण आफ्रिका संघाचे चार गडी शून्यवर बाद झाले. केशव महाराज, फिलेंडर, डीकॉक आणि तेंबा बावूमा यांचा या खेळाडूंमध्ये समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ७५ धावा केल्या आहेत. परंतु संघाने आतापर्यंत ८ गडी गमावले आहेत. आताही दक्षिण आफ्रिका संघाला मोठ्या धावसंख्येची गरज आहे. जडेजाची हॅटट्रिक हुकली दक्षिण आफ्रिका फिलेंडरच्या रुपात ७वा झटका लागला. फिलेंडर देखील आपले खाते उघडू शकला नाही. फिलेंडरला तंबूचा रस्ता दाखवल्यानंतर जडेजाने पुढील चेंडूत केशव महाराजला बाद केले. तथापि, तो हॅटट्रिक करू शकला नाही. केशव महाराज देखील आपले खाते उघडू शकला नाही. मार्करम ३९ धावांवर बाद पहिल्याच सत्रामध्ये दक्षिण आफ्रिका संघाने ६ गडी गमावले. एडन मार्करम ७४ चेंडूंवर ३९ धावा करत बाद झाला. रवींद्र जडेजाने मार्करमचा बळी घेतला. २६ षटकांच्या समाप्तीनंतर आफ्रिका संघ ७० धावांवर खेळत होता. डिकॉकही शून्यावर बाद मोहम्मद शमीने २४ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर डीकॉकला तंबूत धाडले. दक्षिण आफ्रिकेची अवस्था यावेळी ६०/५ अशी होती. डीकॉ आपले खातेही उघडू शकला नाही. त्याच्या जागी मुथुस्वामी खेळण्यासाठी आला. १३ धावांवर डुप्लेसी बाद संघाच्या ५२ धावा असताना दक्षिण आफ्रिकेचा चौथा गडी बाद झाला. मोहम्मद शमीने फाफ डुप्लेसीा बाद केले. डुप्लेसी १३ धावांवर बाद झाला.