
नवी दिल्लीः भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा गोव्यात रंगणार आहे. विशेष म्हणजे, १९५२साली सुरू झालेल्या या आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे यंदाचे ५०वे वर्ष आहे. गोव्यात रंगणाऱ्या चित्रपट महोत्सवात दोनशेहून अधिक चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. इतकंच नव्हे तर, अभिनेते यांना यंदाचा दादासाहेब फाळके जाहीर झाला आहे, त्यामुळं अमिताभ बच्चन यांचे दर्जेदार चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यात येणार आहेत. हा महोत्सव २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. यावेळी महोत्सवामध्ये हिंदी आणि इंग्रजी भाषेतील चित्रपटांबरोबरच प्रादेशिक भाषांतील २६ चित्रपटांचाही समावेश आहे. तसंच, १५ नॉन फिचर चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. ५०वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटही प्रदर्शित होणार आहेत.