'आरे'त झाडे तोडणाऱ्यांना POK मध्ये पाठवा: आदित्य ठाकरे - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, October 5, 2019

'आरे'त झाडे तोडणाऱ्यांना POK मध्ये पाठवा: आदित्य ठाकरे

https://ift.tt/2MiTjao
मुंबई: 'मेट्रो ३'साठी रात्रीच्या अंधारात आरे कॉलनीतील झाडांवर कुऱ्हाड चालवणं हा लज्जास्पद आणि किळसवाणारा प्रकार आहे. झाडे तोडण्यासाठी इतकी तत्परता दाखवणाऱ्या या अधिकाऱ्यांना 'पाकव्याप्त काश्मीर'मध्ये पाठवा आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्याची ड्युटी द्या,' अशी संतप्त टीका शिवसेना नेते यांनी केली आहे.

वाचा: मुंबई 'मेट्रो ३'चे कारशेड आरे कॉलनीत बनविण्याच्या व त्यासाठी तेथील हजारो झाडे तोडण्याच्या निर्णयाला आव्हा देणाऱ्या याचिका काल मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळल्या. तसंच, हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यानं तिथं दाद मागा, असं न्यायालयानं याचिकाकर्त्यांना सांगितलं. न्यायालयाचा हा निकाल येताच मेट्रो प्रशासनानं शुक्रवारी रात्रीपासूनच 'आरे'तील झाडे तोडण्यास सुरुवात केली आहे. पर्यावरणप्रेमी नागरिक, स्वयंसेवी संस्था, संघटनांचा यास तीव्र विरोध होत आहे. 'आरे'तील कारशेडला विरोध दर्शवणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी लागोपाठ ट्वीट करत प्रशासनाच्या या तत्परतेवर टीकेचा घाव घातला आहे. 'आरेमध्ये जे सुरू आहे ते भयंकर आहे. अनेक पर्यावरणप्रेमी व स्थानिक शिवसैनिक वृक्षतोडीला विरोध करण्याचा प्रयत्न करताहेत. पण तिथं पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. ज्या पद्धतीनं आरेतील जंगल नष्ट केलं जात आहे, ते भयंकर आहे. मुंबई मेट्रो ३ साठी सगळं काही उद्ध्वस्त केलं जातंय. पर्यावरण संवर्धनासाठी भारतानं संयुक्त राष्ट्रांमध्ये मांडलेल्या भूमिकेच्या हे पूर्णपणे विरुद्ध आहे,' असं आदित्य यांनी म्हटलं आहे. 'आरे'चा हरित परिसर इतक्या निर्दयीपणे उद्ध्वस्त केला जात असेल तर केंद्र सरकारमधील हवामान बदलासंबंधी खात्याला अर्थ काय? सरकारनं प्लास्टिकच्या प्रदूषणाविरोधात बोलणंही निरर्थक आहे. जो प्रकल्प सर्वांच्या देखत, अभिमानानं अंमलात आणायला हवा, तो रात्रीच्या अंधारात, पोलिसांच्या बंदोबस्तात आणि कावेबाजपणे पूर्णत्वास नेला जातोय. प्रदूषण कमी करण्याच्या नावाखाली होत असलेल्या मेट्रोसाठी झाडे आणि वन्यजीवसृष्टी धोक्यात आणली जातेय, हे विचित्र आहे. अहंकाराची ही लढाई 'मेट्रो ३'च्या हेतूला देखील हरताळ फासणारी आहे,' असंही आदित्य यांनी म्हटलं आहे. वाचा: