
काश्मीर: दहशतवाद्यांसाठी 'नंदनवन' असलेल्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतीय लष्करानं धडक मोहीम हाती घेतली आहे. भारतीय लष्कराच्या जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत. भारतीय हद्दीत घुसखोरीसाठी दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून मदत केल्यानंतर भारतीय लष्करानं प्रत्युत्तरादाखल ही कारवाई केली आहे. पाकिस्तानी सैन्याकडून भारताच्या हद्दीत घुसखोरीसाठी दहशतवाद्यांना मदत केली जात होती. पाकिस्तानच्या या नापाक कारवायांविरोधात भारतीय लष्करानं धडक मोहीम हाती घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं. भारतीय लष्कराच्या जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून कारवाई सुरू केली आहे. जवानांनी दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं. उखळी तोफांचा मारा केला. यात दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त केले आहेत. भारतात घुसखोरीसाठी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय लष्करानं ही कारवाई करून मोठा दणका दिला आहे.