मुंबई: बॉलिवूड सुपरस्टार यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ढासळली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. आता अमिताभ यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यांना काम न करण्याचाही डॉक्टरांचा सल्ला आहे. पण डॉक्टरचं ऐकतील तर ते अमिताभ कसले! अलीकडेच त्यांनी त्यांच्या ब्लॉग पोस्टमध्ये सांगितलं की ते एका दिवसात १८ तासांची शिफ्ट करताहेत. ते लिहितात की त्यांचं काम शिल्लक आहे आणि जेव्हा ते रुग्णालयात होते तेव्हा त्यांचे ते काम शिल्लक राहिले होते. इतकंच नव्हे तर अमिताभ यांनी असंही सांगितलं की एकाच दिवसात त्यांनी आपल्या प्रसिद्ध टीव्ही शो ''च्या तीन एपिसोडचं शूटिंग केलं होतं! त्यांनी लिहिलंय, 'हो सर, मी काम करतो. मी दररोज काम करतो. मी कालही काम केलं होतं, जे १८ तासांनंतर पूर्ण झालं. यामुळे मला प्रेम आणि आशीर्वाद मिळतात.' तब्येत खराब असल्यामुळे बीग बी २५ व्या कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होऊ शकले नव्हते. या फेस्टिव्हलमध्ये अमिताभ गेली सहा वर्षे सातत्याने सहभागी होत आहे.