मुंबई: कांदिवलीतील येथील साईबाबा मंदिरात आज, रविवारी पहाटेच्या सुमारास आग लागली. या भीषण आगीत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती मिळते. अग्निशमन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, रविवारी पहाटेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. काही वेळात ही आग सर्वत्र पसरली. दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर आहे. मंदिराला आतून बंद होते आणि पीडित झोपले होते. झोपेत असताना ही आग लागली आणि यात ते होरपळले. अग्निशमन दलाला पहाटे सव्वाचार वाजताच्या सुमारास या आगीच्या घटनेची माहिती मिळाली. अग्निशमन अधिकारी, कर्मचारी बंबासह साडेचार वाजता घटनास्थळी पोहोचले. पुढच्या नऊ मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले. दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर आहे, अशी माहिती अग्निशमन विभागाच्या नियंत्रण कक्षातून देण्यात आली. मृतांची ओळख पटली असून, सुभाष खोडे (२५) आणि युवराज पवार (२५) अशी दोघांची नावे आहेत. कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात नेले असता, त्यांना मृत घोषित करण्यात आले, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली. मनू गुप्ता ९० ते ९५ टक्के होरपळला असून, कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयातून सायन रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले असल्याचे महापालिकेने सांगितले.
https://ift.tt/2L20xT6