शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांचा शिवतीर्थावर शपथविधीः राऊत - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, November 3, 2019

शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांचा शिवतीर्थावर शपथविधीः राऊत

https://ift.tt/2NBgrSk
मुंबईः राज्याचा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला तरी अद्याप सर्वात मोठ्या पक्ष असलेल्या भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही. त्यामुळे राज्याचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचा करण्यासाठीच्या अंतिम निर्णयापर्यंत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आले आहेत, अशी माहिती शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. लवकरच शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असून त्याचा शपथविधी शिवतीर्थावर होणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी आज एका पत्रकार परिषदेत केल्याने राज्याचे राजकारण एका वेगळ्या वळणावर आल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्रीपदासंबंधी अडीच-अडीच वर्षाचे आश्वासन शिवसेनेला भाजपने कधीच दिले नव्हते या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना-भाजप यांच्यात सुरू असलेली बोलणी फिस्कटली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.