उसने घेतलेले ३० हजार परत केले नाहीत, मित्राची गोळ्या घालून हत्या - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, March 18, 2021

उसने घेतलेले ३० हजार परत केले नाहीत, मित्राची गोळ्या घालून हत्या

https://ift.tt/3ty4FLG
हुगली: पैसा हा घट्ट नात्यांमध्येही वितुष्ट निर्माण करतो, हे अनेक घटनांमधून दिसून आले आहे. पश्चिम बंगालच्या हुगलीमध्येही अशीच एक घटना घडली आहे. पैशांवरून एका मित्राने आपल्या खास मित्राची केली. फक्त ३० हजार रुपयांसाठी त्याने मित्राला संपवले. या हत्येच्या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका तरुणाने आपल्याच मित्राची अवघ्या ३० हजार रुपयांसाठी हत्या केली. त्याने आपल्या दोन मित्रांकडून ३० हजार रुपये उसने घेतले होते. या पैशांवरूनच वाद झाला. त्यानंतर त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, अवघ्या ३० हजार रुपयांसाठी दोन मित्रांनी आपल्या एका मित्राची गोळ्या घालून हत्या केली. आनंद सिंह (वय ३०) असे मृताचे नाव आहे. तर दीपक जयस्वाल आणि भोला दास अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्याखाली दोन्ही आरोपींना अटक केली आहे. त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. हुगलीच्या रिसडा येथील कुंडू कॉलनी परिसरात एका तरुणाची हत्या करण्यात आली. या घटनेचा तपास केला असता, आनंद सिंह याने आरोपींकडून ३० हजार रुपये उसने घेतले होते. ते पैसे वेळेवर परत न केल्याने तिघांमध्ये वाद झाला. त्यानंतर दोघांनी मिळून आनंदची हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.