'बविआ'चा महाविकास आघाडीला पाठिबा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, November 27, 2019

'बविआ'चा महाविकास आघाडीला पाठिबा

https://ift.tt/2rqx2Rs
मुंबई: यांच्या बहुजन विकास आघाडीनं महाविकास आघाडीच्या सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. बविआचे तीनही आमदार महाविकास आघाडीसोबत सत्तेत सहभागी होतील, अशी माहिती हितेंद्र ठाकूर यांनी माध्यमांना दिली. महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं आहे. गुरुवारी, २८ नोव्हेंबरला मुंबईतील शिवतीर्थावर सायंकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी उद्धव यांना राज्यपाल मुख्यमंत्रिपदाची शपथ देणार आहेत. उद्धव यांच्या नेतृत्वाखालील सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी ७ दिवसांची म्हणजेच ३ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

महाविकास आघाडीच्या वतीने युवासेनाप्रमुख व नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील, काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, शिवसेनेचे नेते सुभाष देसाई व अन्य प्रमुख नेत्यांनी राज्यपालांची राजभवन येथे भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. उद्धव ठाकरे हे आमच्या आघाडीचं नेतृत्व करतील, असं यावेळी सांगण्यात आलं. हा दावा राज्यपालांनी स्वीकारला असून लगेचच उद्धव यांना सत्तास्थापनेसाठी पाचारण केलं. त्यानंतर आज, बुधवारी विधानभवनात नवनिर्वाचित आमदारांना शपथविधी झाला. आता उद्धव यांच्या नेतृत्वाखालील सरकारला बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. याआधीच अनेक अपक्षांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. आता हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीनंही महाआघाडीच्या सरकारला पाठिंबा दिला आहे. या पक्षाचे तीनही आमदार सरकारमध्ये सहभागी होतील, अशी माहिती हितेंद्र ठाकूर यांनी माध्यमांना दिली. विशेष म्हणजे, राज्यात भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रिपद आणि समान वाटा या मुद्द्यांवरून संघर्ष सुरू असताना बहुजन विकास आघाडीच्या आमदारांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपला साथ दिली होती. भाजप सरकारला त्यांनी पाठिंबा दर्शवला होता.