'सेना आमदार फोडण्याची कुणाची हिम्मत नाही' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, November 7, 2019

'सेना आमदार फोडण्याची कुणाची हिम्मत नाही'

https://ift.tt/34DHuTK
मुंबई: ज्यांच्याकडे १४५ चा आकडा आहे, ज्याच्याकडे बहुमत आहे त्याने सरकार स्थापन करावी असे सांगताना शिवसेनेचा एकही आमदार फुटणार नाही, आमच्या आमदारांच्या आसपासही फिरण्याची कुणाची हिमंत नाही, असे शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार याचा पुनरुच्चाही राऊत यांनी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांची मातोश्री येथे बैठक आयोजित केली असून, सर्व आमदारांना ते मार्गदर्शन करणार असल्याचे राऊत म्हणाले. उद्ध ठाकरे शिवसेनेच्या आमदारांशी बोलतील, त्यांना विश्वासात घेतील. राज्यात नेमकी काय परिस्थिती आहे, शिवसेनेची त्यावर काय भूमिका आहे, याबाबत उद्धव ठाकरे सर्व आमदारांना मार्गदर्शन करणार आहे. काही पक्षांमधील लोकांनी आम्हाला सांगितले की, शिवसेनेच्या आमदारांना संपर्क केला जात आहे, आमिष दाखवले जात आहे. या मुळे आम्ही खबरदारी घेत आहोत. देशात आमदारांना फोडण्याचे काम अनेक राज्यांमध्ये झालेले आपण पाहिलेले आहे. ज्यांच्याकडे सत्ता असते, यंत्रणा असते ते लोक असे हातखंडे वापरत असतात. मात्र, स्वच्छ राज्यकारभार करण्याचे अभिवचन देणाऱ्यांनी असे हातखंडे वापरू नये, असा चिमटाही राऊत यांनी नाव न घेता भारतीय जनता पक्षाला काढला. मात्र, शिवसेनेचेच काय पण काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अशा विरोधी पक्षांचे आमदारही आता फोडण्याची कुणाची हिम्मत नसल्याचे राऊत यांनी ठासून सांगितले. वाचा- भारतीय जनता पक्षाचे विधिमंडळ पक्षाचे नेते निवडले गेले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री बनावे, त्यांच्याशी आमचे संबंध चांगले आहेत. आमचे त्यांच्याशी कोणतेही व्यक्तीगत भांडण नाही. त्यामुळे फडणवीस यांनी मुख्यमंत्री बनण्याऐवजी नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री बनावे असे आमचे म्हणणे मुळीच नाही, या सगळ्या अफवा आहेत, असेही राऊत म्हणाले. भारतीय जनता पक्षासोबत शिवसेनेची चर्चा का होत नाही, हा डेडलॉक कशासाठी, असा प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की, शिवसेना कधी कोणताही डेडलॉक ठेवत नाही, चाव्या वगैरे ठेवत नाही. शिवसेनेकडे फक्त एकच चावी आहे. आणि ती म्हणजे सत्याची चावी, असे सांगत राऊत यांनी भारतीय जनता पक्षाने दिलेला शब्द पाळला नाही, या कडे उंगुलीनिर्देश केला. वाचा- संजय राऊत डायलॉगबाजी करत नाही संजय राऊत हे डायलॉगबाजी करत नाहीत. संजय राऊत हे शिवसेनेचे भूमिका मांडत असतात. संजय राऊत यांना कोणत्याही अपेक्षा नाहीत, त्यांना मुख्यमंत्री बनायचे नाही, असेही राऊत यांनी आपल्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना म्हटले.