मैदानात शिवीगाळ; गोलंदाजाला दिली 'ही' शिक्षा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, November 17, 2019

मैदानात शिवीगाळ; गोलंदाजाला दिली 'ही' शिक्षा

https://ift.tt/3456y6x
सिडनी: मैदानातच खेळाडूला शिवीगाळ करणं ऑस्ट्रेलियाच्या जलदगती गोलंदाजाला महागात पडलं आहे. सामना सुरू असताना खेळाडूबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज याला निलंबित करण्यात आलं आहे. त्यामुळं पाकिस्तानविरुद्ध येत्या आठवड्यात सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीत तो खेळू शकणार नाही. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात येत्या आठवड्यापासून कसोटी सामना सुरू होणार आहे. मात्र, त्याआधीच ऑस्ट्रेलियाला मोठा दणका बसला आहे. जलदगती गोलंदाज जेम्स पॅटिन्सन याला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आलं आहे. गेल्या आठवड्यात क्वीन्सलँडविरुद्ध शॅफील्ड शील्ड सामन्यादरम्यान त्यानं ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या आचारसंहितेचं उल्लंघन केलं. या प्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आलं. पॅटिन्सन नक्की काय म्हणाला, हे मात्र स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र, 'क्षेत्ररक्षण करताना त्यानं एका खेळाडूबद्दल अपशब्द वापरल्याचं स्पष्ट झालं आहे' असं ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डानं म्हटलं आहे. आचारसंहितेचं उल्लंघन करण्याची ही त्याची गेल्या दीड वर्षातील तिसरी वेळ आहे. त्यामुळं त्याला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आलं आहे. दरम्यान, पॅटिन्सनवर एका सामन्यासाठी बंदी घातल्यानं मिशेल स्टार्कचा कसोटी खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी सामना होत आहे. गुरुवारपासून होणाऱ्या या कसोटी सामन्यात आता मिशेल स्टार्कच्या समावेशाची शक्यता आहे.