मध्य प्रदेशात उघडणार देशातली पहिली 'टाइम बँक' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, November 2, 2019

मध्य प्रदेशात उघडणार देशातली पहिली 'टाइम बँक'

https://ift.tt/325lG1B
मध्य प्रदेशात देशातली पहिली '' सुरू होणार आहे. ही बँक रुढार्थाने आपल्या पैशांच्या देवाणघेवाणीच्या बँकेसारखी बँक नव्हे. येथे देवाणघेवाण होणार ती वेळेची, किंबहुना सत्कर्मी लावलेल्या वेळेची. या टाइम बँकेत तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणतीही स्वेच्छिक सेवा द्या आणि त्या बदल्यात तुमच्या खात्यात तितकेच तास जमा केले जातील, ज्यांचा उपयोग तुम्ही अशाच कुठल्या अन्य प्रकारच्या सेवेसाठीही करू शकाल. राज्य सरकारच्या अध्यात्म विभागाने शुक्रवारी हा आदेश जारी केला. अपर मुख्य सचिव मनोज श्रीवास्तव यांनी सांगितलं की या संबंधी सर्व जिल्हा कलेक्टरांना यासंबंधीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. या योजनेचा उद्देश लोकांमध्ये एकमेकांप्रति वाढवणे आहे. कोणी एखाद्या गरजवंताची जितकी मदत करेल तितके तास त्याच्या खात्यात जमा होतील. जेव्हा त्याला कधी मदतीची गरज असेल तेव्हा याच जमा तासांच्या मदतीने त्याला टाइम बँक नेटवर्कमधून अन्य कुणाची मदत मिळेल. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या ज्येष्ठ नागरिकाची काळजी घेत आहात किंवा गरीब मुलांना शिकवत आहात तर त्याबदल्यात तुमच्या खात्यात काही तास जमा होतील.