राष्ट्रपती राजवटीची धमकी हा जनादेशाचा अपमान: शिवसेना - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, November 2, 2019

राष्ट्रपती राजवटीची धमकी हा जनादेशाचा अपमान: शिवसेना

https://ift.tt/339m8xk
मुंबई: भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत सुरू झालेला सत्तास्थापनेबाबतचा वाद अधिकच चिघळण्याची चिन्हे दिसत असताना शिवसेनेचे खासदार यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावर जोरदार टीकास्त्रे सोडले आहे. राज्यातील जनतेने महायुतीला सत्तास्थापनेसाठी जनादेश दिला असताना सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात राष्ट्रपती राजवटीचा मुद्दा उपस्थित करत धमकी दिली असून ही धमकी म्हणजे जनमताचा अपमान असल्याचे राऊत म्हणाले. राष्ट्रपतींच्या नावाचा वापर करणे गैर असून राष्ट्रपती तुमच्या खिशात आहेत का, असा संतप्त सवालही राऊत यांनी केला आहे. दरम्यान, राज्यातील जनतेने भाजप-शिवसेना युतीला जनादेश दिला असून आम्ही युतीधर्माचे पालन करू अशी भूमिकाही राऊत यांनी घेतली आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राऊत बोलत होते. आता ईडीची धमकी देणं बंद झाले असून, आता राष्ट्रपतींची धमकी देणं सुरू झाले असल्याचे म्हणत राऊत यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर निशाणा साधला. राष्ट्रपतींना राज्याच्या गोंधळात आणणे योग्य नसल्याचेही ते म्हणाले. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर पक्ष आपसात चर्चा करत असून केवळ भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हेच दोन पक्ष चर्चा करत नाहीत, याकडे लक्ष वेधत राऊत यांनी भाजपने समान सत्तावाटपाबाबत निर्णय घ्यावा,असे अप्रत्यक्षपणे सूचित केले. वाचा- दलवाई यांच्या भूमिकेचे स्वागत शिवसेनेला पाठिंबा द्यावा अशी मागणी करणारे पत्र काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवल्याच्या मुद्द्यावरही राऊत यांनी भाष्य केले. हुसेन दलवाई हे काँग्रेसचे ज्येष्ठ, समाजवादी विचारांचे नेते आहेत. त्यांनी मांडलेल्या भूमिकेचे स्वागतच करायला हवे असे सांगताना, राज्यातील जनतेने युतीला जनादेश दिला असून आम्ही युतीधर्म पाळणार आहोत असे पुन्हा एकदा स्पष्ट केले. वाचा- सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानाचा विपर्यास केला गेला- दानवे सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात राष्ट्रपती लागू करण्याबाबत कोणतीही धमकी दिलेली नसल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. विशिष्ट कालमर्यादेत सरकार स्थापन झाले नाही, तर घटनात्मक पेच निर्माण होतो. या कारणामुळे राष्ट्रपती राजवट लागू होते. मात्र, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी अशी आमची इच्छा नसून राज्याला राष्ट्रपती राजवट परवडणार नाही,असे दानवे यांनी स्पष्ट केले. आम्ही युती धर्माचे पालन करणार आहोत. आमच्या नेत्यांचा बोलण्याचा वेगळा अर्थ काढू नये, असेही दानवे म्हणाले.