फूल टू धमाल! १०८ मेगापिक्सेल कॅमेराचा फोन - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, November 3, 2019

फूल टू धमाल! १०८ मेगापिक्सेल कॅमेराचा फोन

https://ift.tt/36s6FdN
नवी दिल्ली चीनची सुप्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी शाओमीने तब्बल १०८ मेगापिक्सेलचा कॅमेरा असणारा दमदार स्मार्टफोन बाजारात आणण्याची तयारी सुरू केलीय. नुकताच या फोनचा एक टीझरही प्रदर्शित करण्यात आलाय. शाओमीच्या या धक्क्यानं अनेक स्मार्टफोन कंपन्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. येत्या १४ नोव्हेंबर रोजी हा स्मार्टफोन बाजारात दाखल करणार असल्याचं टीझरमध्ये दाखवण्यात आलं आहे. शाओमीचा हा जगातील पहिला १०८ मेगापिक्सेलचा कॅमेरा असणारा स्मार्टफोन ठरणार आहे. या फोनला एकूण ५ कॅमेरे असणार आहेत. Mi CC9 Pro नंतर होणार नव्या फोनचं लॉन्चिंग Mi Note 10 हा फोन CC9 Pro हा फोन बाजारात दाखल झाल्यानंतर लाँच करण्यात येणार आहे. येत्या ५ नोव्हेंबर रोजी CC9 Pro हा फोन बाजारात दाखल होणार आहे. या फोनला नुकतचं थायलँड आणि रशियात मान्यता मिळाली आहे. Xiaomi Mi Note 10 फोनचे फिचर्स (शक्यता) शाओमीच्या या दमदार फोनमध्ये ६.७ इंचाची AMOLED स्क्रीन असणार आहे. यात स्नॅपड्रॅगन ८५५+ असा अद्ययावत प्रोसेसर असेल. फोनमध्ये ६जीबीची रॅम तर १२८ जीबीची स्टोरेज क्षमता देण्यात येणार आहे. याशिवाय फास्ट चार्जिंग सेटअपही असेल. 'नोकिया ९ प्युअर'ला देणार टक्कर शाओमी ५ कॅमेरे असलेला फोन बाजारात दाखल करू इच्छित असल्याचं पाहता याफोनचा नोकिया ९ प्युअरव्ह्यू हा कट्टर प्रतिस्पर्धी ठरण्याची शक्यता आहे. Nokia 9 Pureview या स्मार्टफोनलाही ५ रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. दरम्यान याही फोनबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नोकिया कंपनीकडून देण्यात आलेली नाही.