...तर ५ वर्षांत अयोध्येत राम मंदिर उभारणार! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, November 10, 2019

...तर ५ वर्षांत अयोध्येत राम मंदिर उभारणार!

https://ift.tt/34QvvSP
युसरा हुसैन, : रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमीन विवादावर सुप्रीम कोर्टानं शनिवारी ऐतिहासिक निकाल दिल्यानंतर अयोध्येत उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. हे भव्य राम मंदिर उभारण्यासाठी आणखी पाच वर्षांचा कालावधी लागेल. या निकालाच्या निर्णयाची प्रतीक्षा असलेल्या विश्व हिंदू परिषदेनं मंदिराचा आराखडा आधीच तयार करून ठेवला आहे. राम मंदिर निर्मितीच्या कार्यशाळेशी संबंधित पर्यवेक्षकांच्या म्हणण्यानुसार, 'भव्य राम मंदिराच्या उभारणीसाठी किमान पाच वर्षे लागतील आणि निर्मितीसाठी अविश्रांत आणि अथक काम करणाऱ्या २५० विशेषज्ञ शिल्पकारांची गरज आहे.' विश्व हिंदू परिषदेच्या मंदिर निर्मिती कार्यशाळेशी संबंधित पर्यवेक्षकाच्या म्हणण्यानुसार, 'या क्षणी या कार्यशाळेत कुणीही शिल्पकार नाही. रजनीकांत सोमपुरांच्या नेतृत्वाखाली येथे मंदिर उभारणीसाठी शिळांवर नक्षीकाम करण्यात येत होते. मात्र, सोमपुरा यांचे याचवर्षी जुलैमध्ये निधन झाले. विश्व हिंदू परिषदेच्या या कार्यशाळेत १९९० पासून मंदिरासाठी काम सुरू होतं.' गेल्या तीन दशकांपासून या ठिकाणी दररोज आठ तास शिळांवर नक्षीकाम करण्यात येत आहे. मात्र, आतापर्यंत झालेलं काम हे मंदिराचे निम्मे बांधकाम होईल इतकेच आहे. याचाच अर्थ २१२ खांबांच्या (पिलर) या मंदिराचे १०६ खांब तयार आहेत. 'मंदिर निर्मितीसाठीच्या कार्यशाळेत सध्या कुणीही कारागीर उपलब्ध नाही. जर या ठिकाणी काम पुन्हा सुरू करायचे असेल तर आम्हाला किमान २५० विशेषज्ज्ञ कारागीरांची गरज लागेल आणि मंदिर निर्मितीसाठी त्यांना किमान पाच वर्षांचा अवधी द्यावा लागेल,' असं राम मंदिर निर्मितीच्या कामाची देखरेख करणारे अन्नुभाई सोमपुरा यांनी सांगितलं. 'निम्मे खांब (पिलर) तयार आहेत. मंदिराच्या गाभाऱ्याशी संबंधित कामेही पूर्ण झाली आहेत. मार्बलच्या चौकटींचं कामही पूर्ण झालं आहे. मात्र, अजूनही ५० टक्के काम पूर्ण व्हायचे आहे. त्यात १०६ खांब तयार करणे आणि मंदिराचा कळस आणि छताचं काम शिल्लक आहे,' अशी माहिती अन्नुभाई सोमपुरा यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिली. मी इथे गुजरातमध्ये एका विवाहसोहळ्यासाठी आलो होतो. मात्र, आता शिळांवर नक्षीकाम करणारे माझ्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत आहेत. डिसेंबरमध्ये अयोध्येत गेल्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट झालेल्या असतील, असंही त्यांनी सांगितलं. 'यापुढे काय किंवा कसं करता येईल याबाबत आम्ही काहीही ठरवलेलं नाही. राम जन्मभूमी न्यासाचे सदस्य यावर चर्चा करतील. सध्या देशात शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याकडे आमचं लक्ष आहे,' असं विश्व हिंदू परिषदेचे नेते शरद शर्मा यांनी सांगितले. '१९८४ मध्ये आम्ही (व्हीएचपी) मंदिराच्या निर्मितीसाठी शिलापूजन केलं होतं. त्यावेळी एका भाविकानं सव्वा रुपयाचं दान दिलं होतं. आतापर्यंत मंदिर उभारणीसाठी आठ कोटी रुपये जमा झाले आहेत,' अशी माहिती विश्व हिंदू परिषदेच्या एका नेत्यानं दिली.