विश्वास ठराव! राऊतांचा शेरोशायरीतून इशारा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, November 30, 2019

विश्वास ठराव! राऊतांचा शेरोशायरीतून इशारा

https://ift.tt/2PayWOn
मुंबई: महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार आज विधानसभेत बहुमत सिद्ध करणार आहे. याचं औचित्य साधून शिवसेनेचे खासदार यांनी सूचक ट्विट केलं आहे. 'आजचं बहुमत आम्ही जिंकणारच', असा विश्वास राऊत यांनी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. तब्बल महिनाभराच्या राजकीय नाट्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचं सरकार आलं आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नव्या सरकारचं नेतृत्व करणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा विश्वासदर्शक ठराव आज, शनिवारी विधानसभेत मांडला जाणार असून, त्यासाठी शनिवार आणि रविवार असे दोन दिवसांचे विधानसभा अधिवेशन बोलाविण्यात आले आहे. शनिवारी दुपारी दोन वाजता सत्ताधारी आघाडीतर्फे विश्वासदर्शक ठराव आणला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे. 'आजचा दिवस बहुमताचा आहे. महाविकास आघाडी १७० पेक्षा अधिक मतांनी हा ठराव जिंकेल,' असं त्यांनी म्हटलं आहे. सोबतच राऊत यांनी एक शेर ट्विट केला आहे. 'हमको मिटा सके ये जमाने में दम नहीं, हमसे जमाना खुद है... जमाने से हम नहीं...' असं त्यांनी म्हटलं आहे.