भाजपवाले आमचे शत्रू नाहीत: अजित पवार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, November 30, 2019

भाजपवाले आमचे शत्रू नाहीत: अजित पवार

https://ift.tt/2OYLHLv
मुंबई: महाविकास आघाडीचे सरकारचा विश्वास ठराव आज विधानसभेत मांडला जाणार असतानाच भाजपचे खासदार यांनी राष्ट्रवादीचे नेते यांची भेट घेतल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. अजित पवारांनी मात्र या भेटीत कसलंही राजकारण नसल्याचं स्पष्ट केलं आहे. 'आम्ही वेगवेगळ्या पक्षात असलो तरी एकमेकांचे शत्रू नाही,' असं त्यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा विश्वासदर्शक ठराव आज, शनिवारी विधानसभेत मांडला जाणार असून, त्यासाठी शनिवार आणि रविवार असे दोन दिवसांचे विधानसभा अधिवेशन बोलाविण्यात आले आहे. शनिवारी दुपारी दोन वाजता सत्ताधारी आघाडीतर्फे विश्वासदर्शक ठराव आणला जाईल. त्याबाबतची तयारी आणि मोर्चेबांधणी सर्व पक्षांकडून सुरू असतानाच आज भाजपचे नांदेडचे खासदार चिखलीकर यांनी अजित पवारांची भेट घेतली. चिखलीकर हे माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विश्वासातले मानले जातात. त्यामुळं उलटसुलट चर्चेला उधाण आलं होतं. विश्वास ठरावाच्या वेळी भाजपचे आमदार फुटणार की अजित पवारांचे समर्थक आमदार सरकारला धक्का देणार, अशी चर्चा होती. मात्र, अजित पवारांनी तातडीनं याबाबत खुलासा केला. 'चिखलीकर मला सहज भेटायला आले होते. त्यात कुठलंही राजकारण नाही. ते भाजपमध्ये आहेत आणि मी राष्ट्रवादीमध्येच आहे. चिखलीकर खरंतर मला कालच भेटणार होते. मात्र, महाविकास आघाडी आणि आमच्या पक्षाच्या बैठका उशिरापर्यंत सुरू होत्या. काल शक्य न झाल्यानं मीच त्यांना आज बोलावलं होतं. त्यांना नांदेडला जायचं असल्यानं ते सकाळीच आले,' असं ते म्हणाले. 'सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिल्यानुसार विश्वास ठरावावर खुले मतदान होणार आहे. शिवाय ते लाइव्ह असणार आहे. त्यामुळं यात राजकारण होण्याचा प्रश्नच नाही. कुणीही कुणाच्या संपर्कात नाही,' असं ते म्हणाले. राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये कुठलाही वाद नाही. सर्व काही ठरलेलं आहे. माझ्या उपमुख्यमंत्रिपदाबद्दल पक्षाचे अध्यक्ष निर्णय घेतील, असंही त्यांनी सांगितलं.