शिवरायांचे 'स्वामित्व' एका पक्षाकडे नाही: राऊत - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, November 17, 2019

शिवरायांचे 'स्वामित्व' एका पक्षाकडे नाही: राऊत

https://ift.tt/2rK7zlV
मुंबई: विधानसभा निवडणूक निकालानंतर शिवसेनेची भूमिका ठामपणे मांडून राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेणारे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर पुन्हा एकवार जोरदार प्रहार केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे 'स्वामित्व' कुणा एका पक्षाकडे नाही. राज्य आणि ११ कोटी मराठी जनता हाच शिवरायांचा वंश आहे. शिवराय हेच महाराष्ट्राचे स्वामी आहेत. त्यांना हवे तेच घडेल, असं 'रोखठोक' प्रतिपादन राऊत यांनी केलं. विधानसभा निवडणूक निकालानंतर महाराष्ट्राचं अक्षरशः ढवळून निघालं. मुख्यमंत्रिपद आणि सत्तेत समान वाटा यावरून भाजप-शिवसेना युतीमध्ये बिनसलं आणि निर्माण झाला. अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. आता भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांची 'महाआघाडी' होऊ घातली आहे. आणि यांच्यातील युती जवळजवळ संपुष्टात आली असताना, दुसरीकडे संजय राऊत यांनी भाजपवर प्रहार करणं सुरूच ठेवलं आहे. 'रोखठोक'मधून त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. शिवाजी महाराजांचे स्वामित्व हे कुणा एका पक्षाकडे नाही. राज्य, ११ कोटी मराठी जनता हाच शिवरायांचा वंश आहे. शिवराय हेच महाराष्ट्राचे स्वामी आहेत. त्यांना हवे तेच घडेल, असं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्राचे राजकारण शिवरायांच्या विचाराने चालले आहे काय? महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवरही राऊत यांनी भाष्य करत भाजपवरही तोफ डागली आहे. महाराष्ट्रात प्रत्येक कार्यात शिवरायांचे नाव घेण्याची प्रथा आहे. त्यातून राजकारणही सुटले नाही. आम्ही शिवरायांच्या मार्गावरून चालतो, असे राज्यकर्ते सांगत असतात. म्हणजे ते नेमके काय करतात हे शोधावे लागते, असा टोला त्यांनी लगावला. ‘शिवरायांचा आशीर्वाद फक्त आपल्याला म्हणजे भारतीय जनता पक्षालाच आहे,’ असा प्रचार निवडणुकीत झाला. सातारचे शिवरायांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश घेतला व आता छत्रपतीच आपल्यासोबत असल्याचे पंतप्रधान मोदी व भाजप नेत्यांनी सातारच्या प्रचारसभेत सांगितले. सातारच्या जनतेने उदयनराजे भोसले यांचा मोठा पराभव केला. हा पराभव छत्रपतींच्या विचारांचा नव्हता, तर व्यक्तीचा होता. छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात ‘शिवाजी’ असा केला म्हणून लोकांना चीड आली व शेवटी अमिताभ बच्चन यांना माफी मागावी लागली. ही श्रद्धा महत्त्वाची. महाराष्ट्राचे राजकारण शिवरायांच्या विचाराने खरेच चालले आहे काय?, असा 'रोखठोक' सवाल त्यांनी केला. शिवाजी महाराजांनी जे पेरले तेच महाराष्ट्रात आणि देशात उगवले. महाराष्ट्राच्या मातीत ढोंग आणि अहंकार चालत नाही हीच शिवरायांची शिकवण आहे. शिवाजी राजांच्या नावाने राज्य चालते. त्यांच्या नावाच्या शपथा घेतल्या जातात. शब्द दिले-घेतले जातात. ते शब्द न पाळणारे राज्यकर्ते म्हणून मिरवू लागले की, महाराष्ट्राचे अधःपतन सुरू झाले असे समजावे. महाराष्ट्राने ‘स्वामिकार्या’स प्राधान्य दिले. आज ‘स्वामिकार्य’ सुरू आहे. शिवराय एकजातीय, एकपक्षीय नाहीत. महाराष्ट्र हाच शिवरायांचा वंश. ११ कोटी जनता ही वंशावळ आहे. ‘स्वामीं’ना हवे तेच घडेल, असंही ते म्हणाले.