मुंबई: अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेले शिवसेनेचे नेते, खासदार पुन्हा सक्रिय झाले आहेत. आपल्या खास शैलीत सूचक ट्विट करून त्यांनी सरकार स्थापनेचा निर्धार केला आहे. 'अब हारना और डरना मना है', असं त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे. वाचा: भाजपशी पंगा घेतल्यानंतर शिवसेना आता खूप पुढं निघून आली आहे, हेच राऊत यांनी आपल्या नव्या ट्विटमधून सुचवलं आहे. 'माणूस तेव्हाच हरतो, जेव्हा आपण हरलो आहे असं तो मानतो आणि विजय तेव्हाच होतो, जेव्हा मनाचा निर्धार पक्का असतो. शिवसेनेनं विजयाचा निर्धार केला आहे. आता आम्ही हरणार नाही. आता भीती आणि माघारीची शक्यता नाही,' असं त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सुरू झालेल्या सत्तास्थापनेच्या राजकीय रणधुमाळीत सुरुवातीपासूनच राऊत हे केंद्रस्थानी आहेत. ठरल्याप्रमाणे सत्तावाटप होत नसल्याचं लक्षात आल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राऊत हे रोजच्या रोज पत्रकार परिषदा घेऊन भाजपवर हल्ले चढवत आहेत. त्यांच्या या धडाक्यामुळं राज्यातील राजकीय वातावरण गेले काही दिवस चांगलेच तापले होते. आता भाजपशी जवळपास काडीमोड झाल्यानंतर राऊत यांनी ट्विटर हल्ले सुरू केले आहेत.