जिओला टक्कर देणार एअरटेलचा 'हे' प्लान - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, November 26, 2019

जिओला टक्कर देणार एअरटेलचा 'हे' प्लान

https://ift.tt/2OLd3F2
नवी दिल्लीः दूरसंचार क्षेत्रात रिलायन्स आणि या दोन कंपन्यांमध्ये नेहमी चढाओढ पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी रिलायन्स जिओ आणि एअरटेलनं एकसारखेच प्रीपेड प्लान लाँच केले होते. जिओनं अलीकडेच लागू केलेल्या आययूसीमुळं जिओच्या प्रीपेड प्लानमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. अन्य नेटवर्कवर फोन करण्यासाठी जिओ युजर्सना आता ६ पैसे प्रतिमिनिट भरावे लागणार आहेत. जिओच्या या घोषणेनंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. युजर्सना पुन्हा आकर्षित करण्यासाठी जिओनं आययूसी टॉक टाइम व्हाउचर्स आणि ऑल इन वन प्लान लाँच केला आहे. जिओच्या या ऑल-इन-वन प्लानमध्ये जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल, अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी आययूसी मिनिट, एसएमएस मिनिट आणि इंटरनेट डेटा देण्यात आला आहे. जिओनं ऑल-इन-वन- प्लानची घोषणा केल्यानंतर एअरटेलनंही जिओला टक्कर देण्यासाठी काही प्रीपेड प्लान ग्राहकांसाठी आणले आहेत. जिओ १४९ रुपयांचा प्लान आणि एअरटेल १६९ रुपयांचा प्लान रिलायन्स जिओनं १४९ रुपयांचा ऑल-इन-वन-प्लानमध्ये २४ दिवसांची व्हॅलिटीडीसोबत ३०० आययूसी मिनिट मिळतात. जिओ ते जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १.५ जीबी डेटा युजर्सना मिळणार आहे. एअरटेलच्या १६९ प्लानमध्ये २८ दिवसांच्या व्हॅलिटिडीसह २८ जीबी डेटा आणि अनलिमीटेड कॉलिंग ग्राहकांना मिळणार आहे. जिओ २२२ रुपयांचा प्लान आणि एअरटेलचा २४९ रुपयांचा प्लान जिओचे २२२ रुपयांचा ऑल-इन-वन-प्लानमध्ये २८ दिवसांची व्हॅलिटिडी, १००० आययूसी मिनिट, रोज २ दिवसांचा मोबाइल डेटा युजर्सना मिळणार आहे. एअरटेलच्या २४९ रुपयांचा रिचार्ज प्लान घेतल्यास २८ दिवसांची व्हॅलिटिडी व रोज दोन जीबी डेटासोबत नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यातआली आहे. तसंच, एअरटेलच्या हा रिचार्ज केल्यास ४ लाखांचा टर्म लाइफ इन्शूरन्स मिळणार आहे.