जिओ की एअरटेल? कोणाचा डेटा प्लान बेस्ट - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, November 16, 2019

जिओ की एअरटेल? कोणाचा डेटा प्लान बेस्ट

https://ift.tt/2KslRhF
नवी दिल्लीः दूरसंचार क्षेत्रात रिलायन्स आणि या दोन कंपन्यांमध्ये नेहमी चढाओढ पाहायला मिळते. दोन्ही कंपन्या युजर्सना ऑफर्स देण्याच्या प्रयत्नात असतात. त्यामुळं जिओ आणि एअरटेलचे बरेचसे प्लान एकसारखे आहेत. जिओनं आययूसी लागू केल्यानंतर अनेकांनी जिओकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे. यातून मार्ग काढण्यासाठी जिओनं काही नवीन प्लान लाँच केले आहेत. तर, एअरटेलनंही जिओला टक्कर देण्यासाठी नवा प्लान बाजारात आणला आहे. जिओचा १४९ रुपयांचा प्लान जिओच्या या प्लानमध्ये युजर्सना रोज १.५ जीबी डेटा ऑफर करण्यात आला आहे. या प्लानची व्हॅलिटिडी २४ दिवस आहे. जिओ नेटवर्कसाठी अनिलिमिटेड फ्री कॉलिंग आहे. तसंच दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी ३०० आययूसी मिनिट देण्यात आले आहेत. त्याचबरोबर, युजर्सना १०० फ्री एसएमएससोबतच रिलायन्स जिओचं फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे. एअरटेलचा १६९ रुपयांचा प्लान जिओच्या तुलनेत एअरटेलनं या प्लानमध्ये २८ दिवसांची व्हॅलिटिडी आणि १ जीबी डेटा दिला आहे. तसंच, युजर्सना रोज १०० एसएमएससोबतचं विंक म्युजिक आणि एअरटेल अॅपचं सब्सक्रिप्शन दिलं आहे.