फडणवीसांनी सेनेला करून दिली 'ती' आठवण? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, November 17, 2019

फडणवीसांनी सेनेला करून दिली 'ती' आठवण?

https://ift.tt/2XiopnQ
मुंबई: 'बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या सर्वांना स्वाभिमान जपण्याचा मूलमंत्र दिला आहे', असे सूचक विधान करत भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी मुख्यमंत्री यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या स्मतिदिनी आदरांजली वाहिली आहे. या वेळी फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देणारा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. स्वाभिमान आणि हिंदुत्वाचा बाणा कधीही सोडू नका, असा संदेश या व्हिडिओत बाळासाहेब देताना दिसत आहेत. या ट्विटद्वारे आदरांजली वाहताना फडणवीस यांनी शिवसेनेला हिंदुत्वाची आठवणही करून दिली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. फडणवीस यांनी ट्विट केलेल्या या व्हिडिओत बाळासाहेब म्हणतात, 'तुमचा स्वाभिमान जो पर्यंत जिवंत राहील तो पर्यंत या देशाला चांगले दिवस येण्याची शक्यता आहे, नाहीतर नाही... रसातळाला चाललेय. नाव आणि पैसा... पैसा येतो, पैसा जातो पुन्हा येतो. आणि एकदा का नाव गेलं की ते परत येत नाही. ते येऊ शकत नाही. काळ्या बाजारात देखील मिळायचं नाही. म्हणून नावाला जपा, नाव मोठं करा.' व्हिडिओच्या शेवटी बाळासाहेब, 'हिंदू धर्माचा झेंडा सतत सतत आणि सतत्याने आस्मानात फडकत राहिला पाहिजे.' असे आवाहनही बाळासाहेब शिवसैनिकांना करताना दिसत आहेत. बाळासाहेबांचा या भाषणानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या व्हिडिओत बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे. ते व्हिडिओत म्हणतात, 'आज देहाने आपल्यामध्ये बाळासाहेब नाहीत. पण त्यांच्या विचाराने आणि स्मृतीने ते सदैव आपल्यामध्ये राहणार आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन आम्हाला नेहमीच लाभत राहो.' फडणवीस पुढे म्हणतात, 'हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनी विनर्म आभिवादन करतो. स्वर्गीय बाळासाहेब हे आमच्या सगळ्यांकरिता एक अत्यंत स्फूर्ती देणारे व्यक्तिमत्व होते. महाराष्ट्राचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय असे सर्वप्रकारचे वैभव म्हणून ज्यांच्याकडे पाहता येईल.' बाळासाहेब हे ऊर्जेचे स्त्रोत होते. छोट्यातील छोट्या माणसाला केवळ बाळासाहेबांच्या विचाराने ऊर्जा मिळायची. त्यांना पाहिल्याने ऊर्जा मिळायची. आपल्या एका वाक्याने प्रेरिक करण्याची ऊर्जा आणि किमया बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये होती, अशा शब्दांत फडणवीस यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे.