
मुंबई: राज्यात सत्तास्थापनेचा पेच अजूनही कायम असून राज्यपाल कोश्यारी यांनी तिसरा सर्वात मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता स्थापनेचे आमंत्रण दिले आहे. भारतीय जनता पक्षाने वेट अँड वॉचची भूमिका घेतली असून शिवसेनेने पुन्हा दावा करण्याचा निर्णय घेतला आहे. आज काँग्रेस पक्ष काय भूमिका घेतो यावर सगळी गणितं अवलंबून असून आजचा दिवस निर्णायक मानला जात आहे. पाहुयात आज घडणाऱ्या राजकीय घडामोडींबाबतचे क्षणोक्षणीचे अपडेट्स... लाइव्ह अपडेट्स >> थोड्याच वेळात दिल्लीत काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकिला होणार सुरुवात >> मुंबई: शिवसेनेचीही आज बैठक >> राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा, बैठकीत करणार चर्चा >> राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यपालांनी दिली आज रात्री ८.३० वाजेपर्यंतची वेळ >> आज दहा वाजता होणार काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक >> काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल आणि वेणुगोपाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत घेणार भेट