मुंबई:मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा विश्वासदर्शक ठराव आज, शनिवारी विधानसभेत मांडला जाणार असून, बहुजन विकास आघाडीचे तीन, समाजवादी पार्टी, प्रहार जनशक्तीचे प्रत्येकी दोन आणि शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचे प्रत्येकी एक आमदार आणि सात अपक्ष आमदार सरकारच्या पाठिशी आहेत. यात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने दिली. वाचा लाइव्ह अपडेट्स... Live अपडेट्स: >> नांदेडचे भाजप खासदार प्रतापराव चिखलीकर अजित पवार यांच्या भेटीला >> शिवसेनेचे सुनील प्रभू, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे सरकारवरील विश्वासदर्शक ठराव मांडणार >> दुपारी दोन वाजता सत्ताधारी आघाडीतर्फे विश्वासदर्शक ठराव आणला जाईल >> मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा विश्वासदर्शक ठराव मांडणार