
मुंबई : लक्झरी कार निर्माता कंपनी भारतात जानेवारी २०२० मध्ये Q8 एसयूव्ही लाँच करणार आहे. ही एसयूव्ही १५ जानेवारी २०२० रोजी लाँच केली जाईल. ऑडी भारतात २०२५ पर्यंत आपल्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यास उत्सुक आहे. आगामी एसयूव्हीसाठीची बुकिंगही आत्ताच सुरू करण्यात आली आहे. या कारच्या लाँचिंगमध्ये लक्झरी कार सेगमेंटमध्ये ऑडी आपलं वर्चस्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंह ढिल्लन यांच्या मते, ‘ऑडी Q8 ही कंपनीच्या 'स्ट्रॅटेजी २०२५' चा महत्त्वपूर्ण भाग आहे. कंपनी सी आणि डी सेगमेंटमध्ये मजबूत होण्याच्या प्रयत्नात आहे. तर डी सेगमेंटमध्ये Q8 चं मोठं योगदान असेल.’ वाचा : ऑडीच्या नव्या कारमध्ये ३.० लिटर टीएफएसआय पेट्रोल इंजिन दिलं जाऊ शकतं, ज्याची पीक पॉवर ३४०hp असेल. या कारची पाच जणांची क्षमता आहे. कारमध्ये १०.१ इंच एमएमआय रिस्पॉन्स डिस्प्लेसह ८.६ इंच डिजीटल डिस्प्ले मिळेल, जो एअर कंडिशनिंग सिस्टमच्या खाली बसवण्यात आला आहे. १२.३ आकाराच्या हाय रिझोल्युशन डिस्प्लेमध्ये दोन व्यू देण्यात आले आहेत, जे मल्टीफंक्शन स्टेअरिंग व्हीलने कंट्रोल होतील. या कारमध्ये वर उल्लेख केलेल्या दमदार फीचर्ससह क्रूझ असिस्ट, कर्ब वॉर्निंग, क्रॉसिंग असिस्ट, लेन चेंज वॉर्निंग आणि ३६० डिग्री कॅमेरा देण्यात आला आहे.BSVI मानकांसह येणारी कंपनीची ही दुसरी कार असेल. यापूर्वी ऑडी A6 बीएस ६ मानकांसह लाँच करण्यात आली होती. ऑडी A6 ची एक्स शोरुम किंमत ५४.२० लाख ते ५९.२० लाख रुपये आहे. ही लक्झरी कार फक्त पेट्रोल व्हेरिएंटसह बाजारात उतरवण्यात आली आहे. वाचा : ऑडीच्या या शानदार कारचा सर्वोच्च वेग २५० कि. मी. प्रति तास आहे. ए ६ शून्य ते १०० कि. मी. प्रति तास वेग पकडण्यासाठी फक्त ६.८ सेकंदाचा वेळ घेते. या कारचं मायलेज १४.११ कि. मी. प्रति लिटर असल्याचा दावा ऑडीने केला आहे. नव्या ऑडी ए ६ ची भारतीय बाजारात मर्सिडिज बेंझ ई क्लास, बीएमडब्ल्यू ५ सीरिज, वॉल्वो एस ९० आणि जगवार एक्सएफ या लक्झरी कारसोबत टक्कर आहे.