उद्धवा, अजब तुझे सरकार...: किरीट सोमय्या - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, December 31, 2019

उद्धवा, अजब तुझे सरकार...: किरीट सोमय्या

https://ift.tt/2snTkUN
मुंबई: काँग्रेसचे आमदार यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षानं महाविकास आघाडीच्या सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. 'शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी न सोडणारे भाजपचे मुंबईतील माजी खासदार यांनी याच मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर टीका केली आहे. 'देशद्रोही आता देशभक्त झाले... उद्धवा, अजब तुझे सरकार' असं सोमय्यांनी म्हटलं आहे. यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सत्तेवर आलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार काल पार पडला. ठाकरे सरकारमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्यात काँग्रेसचे मालाड पश्चिमचे आमदार अस्लम शेख यांचाही समावेश आहे. मात्र, अस्लम शेख यांच्या नावाला प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं आक्षेप घेतला आहे. वाचा: सोमय्या यांनी ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करून शिवसेनेला घेरलं आहे. 'अस्लम शेख यांनी २०१५ च्या अधिवेशनात मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याची फाशी रद्द करण्याची मागणी केली होती. तत्कालीन भाजप-शिवसेनेच्या सरकारनं त्यास जोरदार विरोध दर्शवत सहावेळा अधिवेशनाचं कामकाज बंद पाडलं होतं. अस्लम शेखला देशद्रोही ठरवलं होतं. आता तेच अस्लम शेख उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये मंत्री झालेत. हे अजबच आहे,' असं सोमय्या यांनी म्हटलं आहे. वाचा: अस्लम शेख हे मुंबईतील मालाड पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहेत. २००९ पासून सलग तीनवेळा ते विधानसभेवर निवडून आले आहेत. पूर्वी समाजवादी पक्षात असलेल्या अस्लम शेख यांनी नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मुंबई महापालिकेचे नगरसेवक म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. वाचा: वाचा: