राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंचा राजीनामा? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, December 31, 2019

राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंचा राजीनामा?

https://ift.tt/35f1cFb
बीड: राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य सुरू झाले आहे. बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माजलगावचे हे आज मंगळवारी, आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे. मंत्रिमंडळात डावलल्याने त्यांनी हे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे. माजी उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनी यावेळी भाजपचे रमेश आडसकर यांचा पराभव केला होता. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारत त्यांना मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र त्यांना डावलले गेल्याने सोळंके नाराज झाले, त्यांनी मंगळवारी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची वेळ घेतली असून आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार आहेत अशी चर्चा आहे. राष्ट्रवादीचे वाईचे आमदार मकरंद पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याच्या निषेधार्थ त्यांच्या समर्थकांनी पदाचे राजीनामे दिले आहेत. त्यामुळे मंत्रिपद वाटपावरून राष्ट्रवादीत धुसफूस सुरू असल्याचे समोर आले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये खातेवाटपावरून बराच वेळ चर्चा सुरू होती. राज्यात तीन पक्षांचे सरकार आल्यामुळे प्रत्येक पक्षाच्या वाटेला मोजकीच खाती आली आहेत. त्यातही सरकारमध्ये मंत्रिपदासाठी अनेकजण इच्छुक होते.