मायावती भीम आर्मीच्या आझादवर बरसल्या - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, December 22, 2019

मायावती भीम आर्मीच्या आझादवर बरसल्या

https://ift.tt/2PK0BHh
लखनऊः नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात ठिकठिकाणी आंदोलन सुरू असून राजकारणही तापलं आहे. याच मुद्यावरून आता बसपाच्या अध्यक्ष मायावती यांनी भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर निशाणा साधला आहे. चंद्रशेखर आझाद हे फक्त निवडणुकीचा फायदा घेण्यासाठी निदर्शनं करतात आणि तुरुंगात जातात. पक्ष कार्यकर्त्यांनी चंद्रशेखर आझाद आणि त्यांच्यासारख्या स्वार्थी नेत्यांपासून सावध राहावं, असं आवाहन मायावतींनी केलंय. भीम आर्मीचे प्रमुख यांनी दिल्लीत पोलिसांची परवानगी न घेता जंतर मंतर येथे आंदोलन केलं. यामुळे त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. त्यांची रवानगी तिहार तुरुंगात केली गेलीय. मायावतींनी एका मागून एक ट्विट करत आझाद यांच्यावर निशाणा साधला. बसपाचे प्राबल्य असलेल्या राज्यांमध्ये विरोधी पक्षांशी हातमिळवणी करून आझाद हे आंदोलन करत असल्याची दलितांची भावना आहे. निवडणुका जवळ येताच आझाद हे मतांवर परिणाम करणाऱ्या मुद्द्यांवर आंदोलन करतात आणि बळजबरी तुरुंगात जातात, असं मायावती म्हणाल्या. आझाद हे यूपीचे राहणार आहे. पण नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात दिल्लीतील जामा मशिदीतील आंदोलनात ते सहभागी झाले आणि त्यांनी बळजबरी अटक करवून घेतली. याचं कारण म्हणजे दिल्लीत लवकरच निवडणुका होणार आहेत, असं मायावतींनी ट्विटमध्ये म्हटलंय. पक्ष कार्यकर्त्यांनी आझाद सारखे नेते, पक्ष आणि संघटनांपासून सावध राहावं, असं आवाहन मायावतींनी केलंय.