'हिटमॅन'चे एक शतक आणि मोडले अनेक विक्रम! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, December 19, 2019

'हिटमॅन'चे एक शतक आणि मोडले अनेक विक्रम!

https://ift.tt/2EvQ77X
विशाखापट्टणम: वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने १०७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताच्या या विजायचा पाया रचला तो सलामीवीर () आणि एल.के.राहुल यांना दोघांनी. या सामन्यात रोहित शर्माने वनडेमधील २८वे शतक झळकावले. या वर्षातील रोहितचे हे १०वे शतक ठरले. हिटमॅन रोहितने या सामन्यात अनेक विक्रमांना मागे टाकले. जाणून घेऊयात रोहितच्या या विक्रमी खेळीबद्दल... रोहितने सचिन तेंडुलकरचे २१ वर्षापूर्वीचा एक विक्रम मागे टाकला. १९९८मध्ये सचिनने ओपनर म्हणून ९ वेळा शतक केले होते तर ६ वेळा अर्धशतक केले होते. वेस्ट इंडिजविरुद्ध शतकी खेळी करत रोहितने सचिनचा विक्रम मागे टाकला. सचिनने ३२ डावात ९ शतक केले होते. तर रोहितने ४६ डावात १० शतकी खेळी केल्या. यात वनडे, कसोटी आणि टी-२० या सामन्यांचा समावेश आहे. या क्रमवारीत ग्रॅम स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांनी २००५ व २०१६मध्ये प्रत्येकी ९ शतकी खेळी केल्या होत्या. वाचा- वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित आता चौथ्या क्रमांकावर आहे. विशाखापट्टणम येथे झालेल्या सामन्यात शतक करून रोहितने सनथ जयसूर्याच्या २८ शतकांची बरोबरी केली. रोहितच्या पुढे आता सचिन रिकी पॉन्टिंग (३०), विटार कोहली (४३) आणि सचिन तेंडुलकर (४९) हे खेळाडू आहेत. विशाखापट्टणम येथे रोहितने १५९ धावा केल्या. वनडेमध्ये रोहितने आठव्यांदा १५०हून अधिक धावा केल्या. वनडेमध्ये आताप्रर्यंत कोणालाही अशी कामगिरी करता आलेली नाही. रोहितच्या मागे डेव्हिड वॉर्नरने ६ वेळा, तर सचिन तेंडुलकर आणि ख्रिस गेल यांनी प्रत्येकी पाच वेळा १५०हून अधिक धावा केल्या आहेत. रोहितने या वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७७ षटकार मारले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्व प्रकारात सलग तीन वर्ष सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहितच्या नावावर आहे. त्याने २०१८मध्ये ७४ आणि २०१७मध्ये ६५ षटकार मारले होते. वाचा- रोहितने बुधवारी राहुलसोबत पहिल्या विकेटसाठी २२७ धावांची भागिदारी केली. भारतीय जोडीने वेस्ट इंडिजविरुद्ध केलेली पहिल्या विकेटसाठीची ही सर्वोत्तम भागिदारी ठरली आहे. या जोडीने वनडेमध्ये आतापर्यंत ८९.००च्या सरासरीने ८०१ धावा केल्या आहेत. यात चार शतकी भागिदारीचा समावेश आहे. भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध तीन वेळा द्विशतकी भागिदारी केली आहे. विशेष म्हणजे या तिन्हीमध्ये रोहितचा समावेश आहे.