Live: काँग्रेस नेत्यांच्या बैठकीला सुरुवात - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, December 19, 2019

Live: काँग्रेस नेत्यांच्या बैठकीला सुरुवात

https://ift.tt/2tsIfSk
नागपूर: शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतरचं पहिलं अधिवेशन नागपूरमध्ये सध्या सुरू आहे. कामकाजाचा आज चौथा दिवस आहे. आज विधान परिषदेचं कामकाज सुरू होताच नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबई व नागपुरात झालेल्या गोळीबाराचा मुद्दा उपस्थित केला. अधिवेशनातील क्षणोक्षणीच्या घडामोडींवर नजर... लाइव्ह अपडेट्स: >> काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची आज बैठक, महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे बैठकीसाठी नागपुरात दाखल >> राज्यात पुन्हा गँगवार भडकण्याची भीती आहे. सरकार ढिम्मपणे पाहतंय; दरेकरांचा आरोप >> नागपूरमध्ये महापौर संदीप जोशी व मुंबईत शिवसेनेच्या उपविभागप्रमुखावर झाला आहे गोळीबार >> विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला मुंबई व नागपूरमधील गोळीबाराचा मुद्दा >> विधिमंडळ अधिवेशनाचा आज चौथा दिवस, विधान परिषदेचं कामकाज सुरू